BJP LokSabha politics: दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha 2024) भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीने काही मंडळी नाराज आहेत. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) मतदारसंघात फिरून निवडणुकीबाबत चाचपणी करीत आहेत.
दिंडोरी मतदारसंघात कांदा निर्यातबंदी आणि द्राक्षांचे कोलमडलेले भाव यांसह विद्यमान खासदारांचा घटलेला संपर्क ही भाजपच्या उमेदवारापुढे प्रमुख समस्या आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी आपल्या प्रचारात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला आहे. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचाराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातून भाजपसाठी दिंडोरीतील यंदाची लढत सोपी नाही, असा संदेश गेला आहे.
दिंडोरी मतदारसंघात (Dindori Lok Sabha 2024) तीन टर्म प्रतिनिधित्व केलेले भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सध्याच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. गेले आठवडाभर त्यांनी मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे. विशेषत: भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर त्यांचा भर आहे. या गाठीभेटींमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर अन्याय झाला आहे. विद्यमान खासदारांकडून गेल्या पाच वर्षांत चव्हाण यांचा योग्य मानसन्मान केला जात नसल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. या नाराजीतूनच भाजप बंडखोरीची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकारी ही बंडखोरी थांबवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चव्हाण यांच्या बंडखोरीचा फटका भारती पवार यांना बसू शकतो. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मध्यस्थी करावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात दिंडोरी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.
मतदारसंघातील आदिवासी संघटनांकडून चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत पाठिंबा दिला आहे. पेठ सुरगाणा कळवण यांसह विविध तालुक्यांतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे आदिवासी संघटनांमध्येदेखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीबाबत भिन्न मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला या सर्व घडामोडी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.