Varun Sardesai: गद्दारीचा शाप लागला...; तिकीट कापलेल्या शिंदेंच्या खासदारांना सरदेसाईंचा टोला

Kalyan Lok Sabha Election 2024:गद्दारीचा जो शाप होता तो शिंदे गटाला आता लागलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा ज्या चाळीस लोकांनी आम्हाला सोडलं होतं, त्यांनासुद्धा असंच भोगावे लागेल, असे सरदेसाई यांनी नमूद केले.
Kalyan Lok Sabha Election 2024
Kalyan Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: शिंदे गटातील विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil), भावना गवळी, कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील (Shinde Group) खासदारांना गद्दारीचा शाप लागला, असा टोला सरदेसाई यांनी लगावला. (Varun Sardesai Attacks Shinde Group MP)

सरदेसाई म्हणाले, "विधानसभा निवडणुकीतदेखील ज्या 40 लोकांनी आम्हाला सोडलं त्यांनासुद्धा असेच भोगावे लागेल. जवळपास 13 लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ते आता एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत. त्यातील जवळपास सात लोकांचे तिकीट हे कापले गेले आहे. अजून चार खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे,"

कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Election 2024) वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर गुरुवारी डोंबिवली येथे वरुण सरदेसाई यांच्या निवासस्थानी टाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत सरदेसाई डोंबिवलीत आले होते. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गद्दारीचा जो शाप होता तो शिंदे गटाला आता लागलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा ज्या चाळीस लोकांनी आम्हाला सोडलं होतं, त्यांनासुद्धा असंच भोगावे लागेल, असे सरदेसाई यांनी नमूद केले. शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे निगेटिव्ह सर्व्हे आल्याने त्यांची तिकिटे कापली जातात. मला संशय आहे कल्याण लोकसभेतूनदेखील असाच निगेटिव्ह सर्व्हे गेला असेल म्हणून येथील उमेदवार घोषित केला नसेल, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कल्याण लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांचे नाव न घेता सणसणीत टोला लगावला.

Kalyan Lok Sabha Election 2024
Lok Sabha 2024: ठाकरेंचे उमेदवार ईफ्तार पार्टीत, तर शिंदेंचे मेट्रोत; डिजिटल प्रचारातही प्रत्यक्ष भेटीवर भर

सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा होऊनसुद्धा पत्ते कापले जातात, यामुळे कल्याण लोकसभेतील खासदारदेखील सावध भूमिकेत असतील, की माझ्यासोबत असे होऊ नये. तेसुद्धा वारंवार सर्व्हे करत असतात. भाजपसुद्धा सर्व्हे करत असते, असा टोला त्यांनी लगावला.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com