BJP, Eknath Shinde Politics: भाजप, एकनाथ शिंदे यांच्या पडद्यामागे स्वबळाच्या जोर बैठका, महायुतीची शक्यता अधांतरी?

Discord in Mahayuti for NMC elections, BJP aspirants insists own strength, Eknath Shinde's meeting in Mumbai-भाजपच्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीत इच्छुकांचा स्वबळाकडे कल ?
Girish-Mahajan-Eknath-Shinde
Girish-Mahajan-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

BJP-Shivsena News: महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी भाजपने मनावर घेतली आहे. आठवड्याभरात नाशिकमध्ये गुरूवारी दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेतली. त्यामुळे या बैठका चर्चेचा विषय आहे.

जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांचा कारभार भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविला आहे. यापूर्वी जळगावच्या बैठकीत गिरीश महाजन यांनी खाजगीत स्वबळाचे संकेत दिले होते. गुरुवारी नाशिकला झालेल्या बैठकीतही त्याची पुनरावृत्ती झाली.

नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी आणि रस्त्यावरील खड्डे हे नागरिकांना जीवघेणे वाटू लागले आहेत. त्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार आवाज उठवला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपही खडबडून जागी झाली.

Girish-Mahajan-Eknath-Shinde
Dr. Apurv Hiray Politics: हिरे कुटुंबीयांची राजकीय संकटे कमी होईनात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा हिरेंच्या विरोधात नवा सर्जीकल स्ट्राईक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आदेश दिले. भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे आणि सहकारी आरपीआयच्या नेत्यांवर पोलिसांनी स्ट्राइक केला. सध्या शहरात राजकीय नेत्यांवरील कारवाई हाच चर्चेचा विषय आहे. त्याचा फायदा भाजपला होईल असे सूर आहेत.

Girish-Mahajan-Eknath-Shinde
Prakash Londhe : प्रकाश लोंढेंच 'एम्पायर' नाशिक माहापालिकेकडून उद्ध्वस्त: पण, प्रशासन आतापर्यंत काय करत होते? उपायुक्तांची बोलतीच बंद

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांचा मतप्रवाह जाणून घेण्यात आला. बहुतांशी पदाधिकारी आणि इच्छुकांनी स्वबळाचा आग्रह धरल्याचे बोलले जाते. त्यामुळे महायुतीच्या कटक पक्षांमध्ये नेमके धोरण काय याविषयी चर्चा आहे.

भाजपची बैठक नाशिकमध्ये झाली. याचवेळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा मुंबईत घेतला. यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची स्वबळावर निवडणुकीची चाचणी झाल्याचे बोलले जाते. भाजपच्या राजकीय हालचाली लक्षात घेऊन शिवसेना शिंदे पक्ष ही सावध झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच सूचक वक्तव्य केले आहे. महायुतीला प्राधान्य देण्यात येईल. त्याचवेळी स्वबळाची वेळ आल्यास कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे संकेत देण्यात आले. त्यामुळे महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा भाजप आणि सहकारी पक्षांत दुरावा वाढल्याचे चित्र आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com