Prakash Londhe : प्रकाश लोंढेंच 'एम्पायर' नाशिक माहापालिकेकडून उद्ध्वस्त: पण, प्रशासन आतापर्यंत काय करत होते? उपायुक्तांची बोलतीच बंद

Prakash Londhe Empire Nashik Municipal Corporation demolition : आरपीआय नेता व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याने आपले गुन्हेगारी साम्राज्य उभे केले होते. त्यासाठी भुयार असलेली दोन मजली इमारत उभी राहिली. या इमारतीवर आज नाशिक महापालिकेचा हातोडा पडला.
Prakash Londhe
Nashik Crime Mystery | Prakash Londhe Gang Secrets | RPI Leader InvestigationSarkarnama
Published on
Updated on

Prakash Londhe News: आरपीआयचे नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे अनधिकृत एम्पायर आज पाडण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा लवाजमा होता. या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. आरपीआय नेता व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याने आपले गुन्हेगारी साम्राज्य उभे केले होते. त्यासाठी भुयार असलेली दोन मजली इमारत उभी राहिली. या इमारतीवर आज नाशिक महापालिकेचा हातोडा पडला.

धक्कादायक म्हणजे एवढी मोठी इमारत उभी राहत असताना महापालिकेने त्याकडे कानाडोळा केला. या अनधिकृत इमारतीला वीज, पाणी आणि अन्य सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा देखील अप्रत्यक्ष सहभाग दिसून आला.

आज महापालिकेची कारवाई सुरू असताना शेकडो कर्मचारी, पोलीस आणि लवाजमा होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. ही इमारत उभी राहत असताना अतिक्रमण विभाग काय करत होता? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

महापालिका उपायुक्त स्मिता झगडे यांनी या कारवाईची माहिती दिली. त्यावेळी भली मोठी इमारत उभी राहत असताना आणि त्यात गुन्हेगारी घटना होत असताना महापालिका अधिकारी काय करत होते? यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? असा प्रश्न निर्माण झाला. महापालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईवर उपायुक्त स्मिता झगडे यांनी सूचक मौन बाळगले. या प्रश्नाचे उत्तर देणे ऐवजी त्यांनी थातुर मातुर माहिती देणे सुरू ठेवले. त्यामुळे शहराला वेठीस धरणाऱ्या या प्रकारात महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशासनाचे अभय आहे की काय? अशी चर्चा शहरात पसरली.

Prakash Londhe
Diwali Bonus : 'BMC'च्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस! आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, 'दिवाळी धमाका'!

माजी नगरसेवक लोंढे यांनी तळघर असलेली आणि दोन मजल्यांची भली मोठी इमारत उभारली. इमारतीच्या टॉवरवर होर्डिंग लावण्यासाठी स्ट्रक्चर उभे केले. नंदिनी नदीच्या पात्रात आणि पूररेषेत हे बांधकाम होते. ही इमारत आज पाडण्यात आली. यानिमित्ताने थेट नंदिनीपात्रातील झोपडपट्टी आणि बांधकामांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. बांधकाम काढून घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे, असे उपयुक्त झगडे यांनी सांगितले.

Prakash Londhe
Indian Notes Material : भारतीय नोट कागदापासून नाही, तर 'या' मौल्यवान गोष्टींपासून होते तयार

ही सर्व कारवाई महापालिकेने स्वतःहून नव्हे तर पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे झाली. महापालिका हे सर्व गुन्हेगारीचे साम्राज्य उभे राहत असताना महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन मुखदर्शक होते. त्यांच्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव होता याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com