Dr. Apurv Hiray Politics: हिरे कुटुंबीयांची राजकीय संकटे कमी होईनात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा हिरेंच्या विरोधात नवा सर्जीकल स्ट्राईक!

Hiray family in political trouble, Mahila Bank fraud of 18 crores, police file case-शिक्षण मंत्री दादा भुसे आणि माजी आमदार अद्वय हिरे यांच्यातील राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत... पोलीस केसेसचा ससेमीरा कायम
Dada Bhuse & Dr Apurv Hire
Dada Bhuse & Dr Apurv HireSarkarnama
Published on
Updated on

Bhuse Vs Hiray News: माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोलीसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. महिला बँकेतील कर्ज प्रकरणात घोटाळा केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल झाला.

मालेगावच्या राजकारणात शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे उपनेते अद्वय हिरे यांच्यात संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीतील हा राजकीय संघर्ष आता व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावर पोहोचला आहे. हिरे कुटुंबीयांच्या विरोधात शिक्षणमंत्री भुसे यांनी नवा सर्जिकल स्ट्राइक केला आहे.

(कै) भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेवर विविध चौकशी आणि कारवाईचा ससे मिरा आहे. या संस्थेची कोट्यावधी रुपयांची जमीन नुकतीच शासनाने परत घेतली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील हे प्रकरण राजकीय दृष्ट्या चर्चेत आहे.

Dada Bhuse & Dr Apurv Hire
Prakash Londhe : प्रकाश लोंढेंच 'एम्पायर' नाशिक माहापालिकेकडून उद्ध्वस्त: पण, प्रशासन आतापर्यंत काय करत होते? उपायुक्तांची बोलतीच बंद

नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या लेखापरीक्षणात गेल्यावर्षी घोटाळा असल्याचा अहवाल होता. हा अहवाल राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे आरोप होत आहे. त्यानंतर हिरे कुटुंबीयांच्या संचालक पदावर देखील बालंट आले.

Dada Bhuse & Dr Apurv Hire
Raksha Khadse : मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचे नाशिक कनेक्शन, 6 जणांना अटक

या बँकेच्या अध्यक्षा योगिता हिरे आहेत. हे कुटुंबीयांशी संबंधित महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांवर माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आधी पदाधिकारी आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसात १७.७४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वरील शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट कर्ज प्रकरण करण्यात आले. प्रत्यक्षात या कर्ज प्रकरणाची रक्कम हिरे कुटुंबीयांच्या नावावर वर्ग करण्यात आली. त्यातून शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि कर्ज घेतलेल्यांची फसवणूक झाल्याचा दावा पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.

यासंदर्भात शिक्षक मंत्री भुसे आणि हिरे कुटुंबीय यांच्यातील राजकीय संघर्ष नव्या वळण्यावर पोहोचल्याचे बोलले जाते. संबंधित गुन्हे हे खोटे आणि राजकीय देशातून आहेत. संबंधित कर्ज प्रकरणे वैयक्तिक आहेत. त्यात आमचा किंवा बँकेच्या संचालकांचा काहीही संबंध नाही. संबंधित व्यक्ती संस्थेत नोकरी देखील करत नव्हत्या. वैयक्तिक द्वेषातून ही कारवाई होत असल्याचा आरोप महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे यांनी केला आहे.

यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात त्यांना अटक देखील झाली. विरोधकांना विधानसभा निवडणुकीत नामोहरम करण्यासाठी हे पाऊल सरकारच्या आशीर्वादाने उचलले गेल्याचा आरोप झाला होता. निमित्ताने हिरे आणि शिक्षण मंत्री भुसे यांच्यात विधानसभा निवडणुकीत आरोपांची राळ उडाली होती.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com