Rohit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंसाहेब, अमित शाह यांची भाषा समजावून घ्या; रोहित पवारांनी सल्ला देत डिवचलं

Rohit Pawar scolded CM Eknath Shinde over Amit Shah statement : भाजप नेते मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या त्यागाची आठवण करून देण्याच्या विधानावर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया.
Rohit Pawar 2
Rohit Pawar 2Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने केलेल्या त्यागाची आठवण करून दिली.

यावरून आता विरोधकांनी एकनाथ शिंदे यांना डिवचायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील टायमिंग साधलं आहे.

भाजप (BJP) नेते अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत भाजप केलेल्या त्याग मोठा होता. जागा वाटपात याचा विचार करावा, असं म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलीच फिरकी घेतली. भाजप नेते अमित शाह यांना एकप्रकारे एकनाथ शिंदे यांना संधी दिली, ती शेवटची संधी आहे. पुढचे पाच वर्ष त्यांना जे वाटतंय, आमचे सरकार येणार आहे, ते येणार नाही. एकनाथ शिंदे यांना आम्ही पुन्हा संधी देणार नाही. खूप त्याग केलेला आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Rohit Pawar 2
Sanjay Raut : टोल कंपन्यांना सरकारी तिजोरीतून शेकडो कोटींचा परतावा? राऊतांचा 'टक्केवारी'चा गंभीर आरोप

रोहित पवार पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. 2029 ला आम्ही स्वबळाचं सरकार आणू आणि मुख्यमंत्री आमचाच असेल, तो एक सिग्नल होता. आता एकनाथ शिंदेसाहेब (Eknath Shinde) काय करतात हे पाहावे लागेल". मात्र येत्या काळात तिघांना विरोधी पक्ष नेता कोण? याच्यासाठी भांडवे लागेल, अशी परिस्थिती होईल, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं.

Rohit Pawar 2
Sindkhed Raja Constituency: काका विरुद्ध पुतणी लढत होणार? घरातूनच विरोध; शरद पवार कुणाला उमेदवारी देणार VIDEO पाहा

'तुतारी' 'हातात' घेऊन 'मशाली'चा विजय निश्चित

निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्हं हटवण्यात विरोध दर्शवला आहे. 'पिपाणी' हे चिन्हं पक्ष चिन्हांमध्ये राहणार आहे. यावरही आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत लोकांना कळले आहे की, 'तुतारी' कुठली आणि 'पिपाणी' कुठली. तरीही विरोधकांना याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत मत विभागणी करायची असेल". मात्र लोक आता शहाणे झाले आहेत. त्यामुळे 'तुतारी' 'हातात' घेऊन 'मशाली'चा विजय करायचा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com