Nashik constituency 2024 : लोकसभेचा 'सिन्नर पॅटर्न' राजाभाऊंना तारणार का ?

Rajabhau Waje politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजाभाऊ वाजे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून किती लीड मिळणार याचीच चर्चा..
Rajabhau Waje
Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje News : नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे. यामध्ये महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. निवडणुकीत वाजे सिन्नरच्या आपल्या होम ग्राउंड वर किती लीड घेतात? यावर निकालाचे चित्र ठरणार आहे.

या निवडणुकीत माजी आमदार वाजे सिन्नर मतदारसंघातील आहेत. महायुतीचे खासदार गोडसे देवळाली मतदारसंघातील आहेत. हे दोन्ही मतदारसंघ नाशिक शहरा बाहेरचे आहेत. त्यामुळे या दोघांचाही आपल्या घरच्या विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी यांनी चांगला जोर लावलेला होता.त्यातून प्रत्यक्ष मतदारांनी मतदान यंत्रावर काय प्रतिसाद दिला, हा चर्चेचा विषय असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajabhau Waje
Dhule Lok Sabha Constituency : मतदान नकली पण असते का? धुळ्यात काय घडले?

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीतून सिन्नर पॅटर्न म्हणून एक समीकरण पुढे आले आहे. त्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मत विभागणीसाठी उमेदवारी करण्याची खेळी केली होती. त्या निवडणुकीत त्यांना एक लाख 34 हजार मते मिळाली होती. यामध्ये सिन्नर मधून स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना 92 हजार मते मिळाली होती. या लक्षणीय मतांमुळेच त्यांनी लाखाचा टप्पा गाठला होता. या निवडणुकीत शिवसेना-भाजप (BJP) युतीचे हेमंत गोडसे यांना 56 हजार तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समीर भुजबळ यांना अवघी 30 हजार मते मिळाली होती. त्यातून लोकसभेसाठी स्थानिक उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यांनीही पडद्यामागून मदत करून मोठे लीड देण्याचा 'सिन्नर पॅटर्न' उदयास आला होता.

यंदा वाजे हे सिन्नरचे स्थानिक उमेदवार आहेत. ते महाविकास (MahaVikas) आघाडीचे उमेदवार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांची त्यांना साथ आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्व ठिकाणी त्यांना चांगले मतदान झाले आहे. यामध्ये ते सिन्नर मधून किती मते मिळवितात, हा मोठा उत्सुकतेचा विषय आहे. यंदा सिन्नरमध्ये सर्वाधिक 68 टक्के मतदान झाले आहे. ती संख्या दोन लाख 8 हजार 442 मते होते. यामध्ये किमान 1 लाख 40 हजार मते वाजे यांना मिळतील, असा त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा आहे. त्यात 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असे चित्र सध्या रंगविले जात आहे. तसे झाल्यास वाजे यांना ही निवडणूक सोपी होऊ शकते.

Rajabhau Waje
Pune Porsche Accident : पोलिस आयुक्त म्हणजे पुण्याला लागलेले 'कलंक', त्यांना बडतर्फ करा, राऊत कडाडले !

सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष दुय्यम आणि गट महत्वाचे असतात.सध्या येथे वाजे आणि आमदार कोकाटे या दोन प्रमुख गटांमध्ये राजकीय संघर्ष आहे. उदय सांगळे यांचा एक नवा गट शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांच्या सहकाऱ्यांनी देखील वाजे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. पडद्यामागून कोकाटे यांचे देखील त्याला मुकसंमती असावी.त्यामुळेच कोकाटे यांनी माझे समर्थकांना तुम्हाला दिल्लीची वाट मोकळी झाली आहे,असे विधान करून त्याचे बोट लावले होते.

Rajabhau Waje
Pune Porsche Accident : RTO चा गरिबांना दंड, श्रीमंतांकडे कानाडोळा; दोघांना चिरडणारी 'पोर्श' विनानोंदणीच धावली...

मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रचंड गर्दी होती. जनतेने ही निवडणूक आपल्या हाती घेतल्याचे त्यातून दिसून आले. त्यामुळे मतदानाचे प्रमाण उन्हाळा असूनही वाढले. या स्थितीत सिन्नरच्या मैदानावर वाजे चांगला स्कोर करतील हे स्पष्ट होते. वाजे सिन्नर मध्ये असलेल्या सर्व आठ जिल्हा परिषद गटांमधून पुढे असतील, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे श्री राज्य समर्थक खुश आहेत. त्यांच्या आनंदात आमदार कोकाटे समर्थकांचाही हातभार आहे. त्यामुळे या निमित्ताने संपूर्ण सिन्नर एक मुखाने वाजे यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेले दिसले.

(Edited by : Chaitanya Machale)

Rajabhau Waje
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरण : मुख्य आरोपींच्या मध्य प्रदेशमध्ये मुसक्या आवळल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com