Eknath Khadse Vs Girish Mahajan: भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडू नका; शरद पवारांना घट्ट पकडून राहा, महाजनांचा खडसेंना टोला

BJP and NCP : गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप
Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण नेहमीच सुरू असतं. आता मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर जोरदार घणाघात केला आहे, तर त्यांनी केलेल्या टीकेला खडसेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये, राष्ट्रवादीमध्ये राहिलेले लोकंदेखील आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे खडसेंनी आता शरद पवारांना घट्ट पकडून राहावं. इकडे (भाजपकडे) परत येण्यासाठी पुन्हा हातपाय जोडू नका", असा खोचक टोला महाजनांनी खडसेंना लगावला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यानंतर एकनाख खडसेंनीही महाजनांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. "मला यायचं असतं तर कधीच आलो असतो", असं खडसे म्हणाले.

Eknath Khadse and Girish Mahajan
Mahesh Shinde News : ग्रामपंचायत सदस्यसुद्धा अपात्र होत नाही, आम्ही तर आमदार; महेश शिंदेंना भलताच कॉन्फिडन्स

"अजितदादांबरोबर येण्यासाठी तुम्ही काय-काय करत आहात, याची आम्हाला कल्पना आहे आणि अजित पवारांनाही आहे. पण आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करू नका. खडसेंना सर्व पदे आपल्याच घरात हवी असतात. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याचे प्रयत्न करू नये", अशी खोचक टीका महाजनांनी खडसेंवर केली.

महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खडसेंनी म्हटलं की, "गिरीश महाजन सत्तेत असल्यामुळे अशी वक्तव्यं करतात. मला भाजपमध्ये जायचे असते तर कधीच गेलो असतो. यासाठी मला दिल्लीतील नेत्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफरही दिली होती. एवढंच नाही तर राष्ट्रवादीत आल्यापासून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली जात आहे", असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न आपण कधीही केला नाही, असे स्पष्टीकरणही महाजनांच्या वक्तव्यावर बोलताना खडसेंनी दिले. तसेच शरद पवारांची साथ कधीही सोडणार नसल्याचेही खडसेंनी या वेळी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Eknath Khadse and Girish Mahajan
Jaydatta Kshirsagar On Beed Politics: रक्ताची नाती जोडली अन् तोडली जातात, पण...; जयदत्त क्षीरसागरांनी बोलून दाखवली सल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com