Dr. Bharti Pawar : गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्यासाठी भारती पवार प्रयत्नशील!

आमदार सुहास कांदे यांसह प्रवासी शिष्टमंडळाने ही मागणी केली.
Centre minister of state Dr. Bharti Pawar & MLA Suhas Kande
Centre minister of state Dr. Bharti Pawar & MLA Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Manmad Railway issue : चाकरमान्यांची हक्काची गाडी म्हणजेच मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस - मनमाड गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी या मागणीसाठी नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे आणि प्रवासी संघटनेचे शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. (Railway pass holders deemand to restart Godawari express for Mumbai)

नाशिक (Nashik) जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गोदावरी एक्स्प्रेस (Railway Issue) या गाडीने मनमाड, (Manmad) नांदगाव, मालेगाव, लासलगाव, निफाड, नाशिक येथून हजारोंच्या संख्येने नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कामांसाठी प्रवासी प्रवास करीत असतात.

Centre minister of state Dr. Bharti Pawar & MLA Suhas Kande
Suhas Kande News : सुहास कांदे यांनी सांगितले मंत्रीपद न घेण्याचे कारण!

सदर गाडी मनमाड येथून सुटत होती. मात्र कोरोना नंतर ही गाडी बंद करण्यात आली. त्यानंतर तिच्या जागी विशेष गाडी म्हणून डेमो चालविण्यात येयत आहे. मात्र आता ही गाडी धुळे येथून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्यामुळे धुळे येथून येणारी गाडी अगोदरच गर्दीने भरून येत असल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना बसण्यास जागाच राहत नाही.

बंद केलेली पूर्वी जी गोदावरी एक्स्प्रेस होती. ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी गुरुवारी (ता.२९) आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रवाशी संघटनेच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

Centre minister of state Dr. Bharti Pawar & MLA Suhas Kande
Buldhana Bus Accident : 'बसने पेट घेतला, आम्ही काचा फोडून बाहेर पडलो' ; दोन प्रवाशांनी सांगितली 'आप बीती' !

यावेळी नवीन होणाऱ्या रेल्वे लाईन लागत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या विषयावर देखील यावेळी आमदार सुहास कांदे यांनी चर्चा केली. तिसरी रेल्वे लाईन लागत असणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य भाव मिळावा अशी मागणी आमदार कांदे यांनी केली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मनमाड रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, राहुल शेजवळ, ॲड. निखिल परदेशी, संदीप व्यवहारे, कैलास दरगुडे, रामनाथ सानप, कैलास सानप, रमेश दरगुडे, नामदेव दरगुडे, मच्छिंद्र दरगुडे, संतोष दरगुडे, रवींद्र दरगुडे, दीपक दरगुडे, संतोष गांगुर्डे, सचिन दरगुडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com