MLA Suhas Kande News : आपण मंत्रिपदाच्या शर्यतीत नसून नांदगाव मतदार संघाच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी निधी हवाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत बाराशे कोटीहून अधिकचा निधी नांदगाव-मनमाडसाठी उपलब्ध करून दिलाय असे सांगत आमदार सुहास कांदे यांनी मला मंत्रिपद नकोय असे सांगणारा चाळीसपैकी मी एकमेव आमदार असून नांदगाव मतदार संघाच्या विकासासाठी अजूनही निधी आणण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. (I am interested in devolopment of my constituency)
आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिवनेरी या विश्रामगृहाला संलग्न हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते आरामदायी आसनव्यवस्था व डिजिटल साउंड सिस्टिमसह संपूर्ण वातानुकूलित अद्ययावत सभागृहाचे उद्घाटन झाले.
आमदार सुहास कांदे यांनी आपल्या वाटचालीची दिशा स्पष्ट करताना नजीकच्या काळात पक्ष संघटन स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ पालिका जिल्हा परिषदा निवडणूक याबाबत त्यांनी ऊहापोह केला. येत्या सात-आठ महिन्यात नांदगावकरांना पाच सहा नव्हे तर दररोज चोवीस तास गिरणा धरणातील स्वच्छ निर्जंतुक पिण्याचे पाणी मिळणार असून या योजनेसाठी चाळीस कोटींचा निधी उपलब्ध झाला असून येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे मार्गी लागणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शहरवासीयांना दिले. मनमाड-करंजवन ,७८ खेडी नळयोजना व नांदगाव शहरासाठी समांतर पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. त्याचे लोकार्पण देखील लवकर होईल.
कवडे माझे नेते!
अलीकडच्या काळात मनमाड, नांदगाव बाजार समितीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची जबाबदारी आपण घेतो त्यात कुणाला दोष देत नाही. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भावी काळात देखील आपली राजकीय वाटचाल असल्याचे श्री. कांदे यांनी स्पष्ट करत जेव्हा जेव्हा बापूसाहेबांचे ऐकले तेव्हा त्या निवडणुका जिंकल्या आणि जेव्हा नाही ऐकल्या तेव्हा पराजय वाट्याला आला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख किरण देवरे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड, राजाभाऊ जगताप, डॉ. सुनील तुसे, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिढगे, बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, माजी सभापती तेज दादा कवडे, उपसभापती पोपट सानप, रमेश पगार, कैलास पाटील, एकनाथ सदगीर, सतीश बोरसे, यज्ञेश कलंत्री, नीलेश इप्पर, आनंद कासलीवाल, राजाभाऊ देशमुख, डॉ संजय सांगळे, मयूर बोरसे, महेंद्र दुकळे, आबा देवरे, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, अण्णासाहेब पगार, भय्या पगार, डॉ प्रभाकर पवार, डॉ प्रवीण निकम, अंकुश कातकडे, सर्जेराव भाबड, किरण गायकवाड, अप्पा कुनगर, कपिल तेलोरे आदी उपस्थितीत होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.