Nashik ZP Water Supply Issue News : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा परिषदेचे चांगलेच वाभाडे काढले. योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासनाच्या ढिलाईने जनतेला या योजनांचा लाभ होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Centre minister Dr. Bharti Pawar criticized Nashik ZP administration)
केंद्र (Centre) व राज्य सरकार (Maharashtra Government) अनेक चांगल्या योजना जनतेसाठी राबविते. जिल्हा परिषद (ZP) प्रशासन मात्र पिण्याच्या पाण्यासह (Water) सर्वच विषयांबाबत उदासीन असल्याने नागरिकांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही. यापुढे असे झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिला.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या कामकाजावर बैठकीत वादळी चर्चा होऊन या विभागाच्या प्रमुखांना चांगलेच खडेबोल सुनाविण्यात आले. यापूर्वी जिल्हा परिषदेचे असे कामकाज कधीही झाले नसल्याची नाराजी व्यक्त करत डॉ. पवार यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन योजनाबाबत चर्चा झाली. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला आहे अशी विचारणा डॉ. पवार यांनी केली.
प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी १४०० कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, यात किती निधी खर्च झाला याबाबत सोनवणे यांना उत्तर देता आले नाही. त्यावर डॉ. पवार यांनी सोनवणे यांना खडेबोल सुनावत चांगलीच खरडपट्टी काढली. सोनवणे यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी असल्याचे देखील डॉ. पवार यांनी बोलावून दाखविले. या विभागासाठी प्रशासनाने स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांची मागणी का केली नाही. पाणी हा जिव्हाळाचा विषय असताना त्यांचा कार्यभार हा प्रभारी कडे कसा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
बांधकाम विभाग दोनचा पदभार देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले असता डॉ. पवार चांगल्याच संतापल्या. पदभार देण्यासाठी केवळ सोनवणेंच आहे का असा सवाल त्यांनी केला. तसेच सोनवणे यांच्याकडून पदभार काढून स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबतही डॉ. पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी थांबत नसल्याने प्रसूती होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांना सभागृहात उभा राहून कामाबाबत विचारणा केली. तब्बल तासभर उभे राहत त्यांच्याकडून उत्तरे घेण्यात आली. आरोग्य विभागाकडून ऑक्टोंबर महिन्यांपासून औषध खरेदी झाली नसल्याने, ही खेरदी का झाली नाही. यात कोणी दिरंगाई केली त्यावर कारवाई करा अशा शब्दात डॉ. पवार यांनी यावेळी सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.