ShivSenaUBT : पवारसाहेबांच्या खासदाराला ठाकरेंच्या कडवट शिवसैनिकांचे आव्हान

Parner Assembly Constituency : पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना मविआतील शिवसेना ठाकरे पक्षातील कडवट शिवसैनिकांचे आव्हान आहे.
ShivSenaUBT party 1
ShivSenaUBT party 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिकाने खासदार नीलेश लंके यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला असून, खासदार लंके वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने कसा मार्ग काढतात, याकडे लक्ष लागलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पारनेरचे तालुकाप्रमुख डाॅ. श्रीकांत पठारे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. यामुळे पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांचा कट्टर शिवसैनिकांविरोधात 'सामना' रंगल्याची चर्चा आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघ हा खासदार नीलेश लंके यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदारकीच्या निवडणुकीपूर्वी या विधानसभा मतदारसंघाचे लंके आमदार होते. लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून लढवली आणि भाजपचे सुजय विखेंविरोधात विजय मिळवला. तेव्हापासून खासदार लंके चर्चेत आहेत.

ShivSenaUBT party 1
Pawar Vs Shinde : रोहित पवार अन् राम शिंदेंच्या नावाशी साधर्म्य असलेले 'एवढे' उमेदवार रिंगणात

यामुळे पारनेर विधानसभा निवडणुकीचा जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सोडवी, अशी आग्रहाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून होत होती. तशी वरिष्ठांकडे देखील ही मागणी स्थानिक नेत्यांनी लावलू ठरली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे देखील या जागेची मागणी केली होती. तशा बैठका देखील झाल्या होत्या. परंतु जिंकणारे जागी असल्याने शरद पवार आणि त्यांच्या नेत्याने जागेवरचा दावा कायम ठेवला.

ShivSenaUBT party 1
Thorat Vs Vikhe : आता थोरातांनी विखेंना ललकारलं; म्हणाले, 'होऊन जाऊ दे'

यातच या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांना उमेदवारी दिली. राणी लंके यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून विरोध होता. संदेश कार्ले आणि श्रीकांत पठारे यांनी उद्धव ठाकरेंकडे या जागेबाबत मागणी लावून धरली होती. परंतु शरद पवार आणि खासदार लंकेंच्या दबावामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला काहीसे मागे सरकावे लागले.

महायुतीत देखील बंडखोरी

राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित दाखल करताच, काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, पारनेरचे तालुकाप्रमुख डाॅ. श्रीकांते पठारे यांनी अर्ज दाखल केले. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते माधवराव लामखेडे यांनी देखील अर्ज भरला आहे. महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काशिनाथ दाते उमेदवारीच्या रिंगणात आहे. असे असतानाही सुजित झावरे आणि माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी देखील अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन्ही बाजूने बंडांची चर्चा अधिक होताना दिसते.

शिवसेनेला कोणताही शब्द दिला नव्हता

उमेदवारीसाठी पहिल्यापासून आक्रमक असलेले संदेश कार्ले यांचे आव्हान खासदार नीलेश लंके यांना मोठे असणार आहे. कार्ले यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून, संघटनात्मक मोट चांगली आहे. त्यामुळे खासदार लंके यांनी कार्ले यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमार्फत प्रयत्न सुरू केले आहेत.

परंतु पारनेरबाबत लोकसभा निवडणुकीला कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता. त्यामुळे उमेदवारीचा विषय येतच नाही, 'मविआ' म्हणून आम्ही निवडणुकीला समोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया खासदार लंकेंनी दिली आहे. पारनेरमधील सर्व राजकीय घडामोडी आता 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com