Manikrao Kokate : थेट कृषी मंत्र्यांना धक्का देणारे तुकाराम दिघोळे कोण होते?

Manikrao Kokate Vs Tukaram Dighole : 1995 साली एका प्रकरणात कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा दावा करत तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यात माणिकराव कोकाटे दोषी आढळले होते.
Tukaram Dighole-Manikrao Kokate.jpg
Tukaram Dighole-Manikrao Kokate.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तब्बल ३० वर्षे जुन्या प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. 1995 साली एका प्रकरणात कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा दावा करत तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यात कोकाटे दोषी आढळले होते. आज (गुरुवार, 20 फेब्रुवारी) अखेरीस या प्रकरणाचा निकाल लागला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखाद्या फौजदारी खटल्यात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यास संबंधित लोक प्रतिनिधीचे विधिमंडळ किंवा संसदेचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार आता कोकाटे यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचीही आमदारकी रद्द होऊ शकते. सध्या या प्रकरणात कोकाटे (Manikrao Kokate) यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच उच्च न्यायालयात दाद मागून शिक्षेला स्थगिती मिळविण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे.

तुकाराम दिघोळे कोण होते?

तुकाराम सखाराम दिघोळे (Tukaram Dighole) असे त्यांचे पूर्ण नाव. सिन्नर तालुक्यातील जायगाव हे त्यांचे मूळ गाव. सिन्नरच्या राजकारणात दिघोळे यांचे तीन दशके वर्चस्व होते. जिल्हा बॅंकेतून राजकारणाला सुरूवात केलेल्या दिघोळे यांनी बॅंकेचे संचालक, राज्य सहकारी बॅंकेचे विभागीय अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यध्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्या.  सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची होती.

Tukaram Dighole-Manikrao Kokate.jpg
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; बॅाम्बने गाडी उडवून देणार...

ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पवार यांच्याच एस काँग्रेसमधून 1985 साली ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर 1990 मध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार आणि जनता दलाचे तत्कालीन उमेदावर सूर्यभान गडाख यांचा पराभव करून ते निवडूनही आले. पुढे 1995 सालच्या जागा वाटपातील वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला. काँग्रेसने भगीरथ शिंदे यांना तिकीट दिले. तर शिवसेनेकडून दिगंबर देशमुख यांना मैदानात उतरविण्यात आले होते.

दिघोळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उडी घेतली आणि निवडूनही आले. अपक्ष निवडून येणे त्यांच्या पथ्यावर पडले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ते ऊर्जा आणि ग्रामविकास राज्यमंत्री झाले. 1999 च्या निवडणुकीपूर्वी दिघोळे राष्ट्रवादीत गेले. तर शिवसेनेने माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत कोकाटे यांनी दिघोळे यांचा 24 हजार मतांनी पराभव केला. 2004 ला पुन्हा शिवसेनेचे कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे दिघोळे अशी लढत झाली. त्यात कोकाटे 20 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

Tukaram Dighole-Manikrao Kokate.jpg
Manikrao Kokate Politics: Breaking News; धक्कादायक, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास

कोकाटे आणि दिघोळे पारंपारिक विरोधक बनले होते. या विरोधातून दिघोळे यांनी आपल्याविरोधात याचिका दाखल केल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. 1997 मध्ये कोकाटे जिल्हा परिषदेचे सभापती होते. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील दहा टक्के योजनेतील सदनिका घेतली होती. स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावे त्यांनी दोन सदनिका घेतल्या होत्या.

शहरातील येवलेकर मळा या उच्चभ्रू परिसरातील नागरी कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत अतिरिक्त जमिनीवर हे बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये केवळ आर्थिक दुर्बल आणि घर नसलेल्या व्यक्ती अशी पात्रता आहे. त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्बल असल्याचे शासनाला सांगितले होते. यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तत्कालीन आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता. याच दरम्यान, 30 नोव्हेंबर 2019 मध्ये दिघोळे यांचे निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com