Dhananjay Munde News: जळगावला पावसाचा खंड पडलेल्या भागात अग्रिम भरपाई द्या!

Drought affected farmers of Jalgaon will get advance compensation-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला कृषिमंत्री मुंडे यांचा प्रतिसाद
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Munde On Jalgon Drought : खरीप हंगामांतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा भागातील शेतकऱ्यांना पीकविम्याच्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथील बैठकीत दिले. (Guardian Minister Gulabrao Patil deemands advance relief for farmers)

जळगावचे (Jalgaon) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) मदतीची मागणी केली होती. त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुंबईत बैठक घेतली.

Dhananjay Munde
Nashik NCP News : विमा कंपन्या मुख्यमंत्र्यांचेही ऐकेनात, शेतकरी प्रतीक्षेतच!

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रामाणात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत शेतकरी अडचणीत आहेत. त्याबाबत विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत आमदारांकडे सातत्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र देऊन याबाबत मागणी केली होती.

या पत्रानुसार कृषिमंत्री धनंजय मुडे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती, या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुपकुमार यादव, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले, की राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र शेतकऱ्यांना अग्रिम नुकसानभरपाई देण्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Dhananjay Munde
NDCC News : राष्ट्रवादीच्या थकबाकीदार नेत्यांना पोलिस देताहेत संरक्षण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com