Dada Bhuse News : राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती; कृषिमंत्री शक्तिप्रदर्शनात व्यस्त! दादा भुसेंची झाली कोंडी

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट घोंगावते आहे.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik : राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे स्वत:च्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेणे अपेक्षित असताना इतर मंत्र्यांवरच ही वेळ आल्याचा प्रश्न नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सारवासारव केली. कांदा प्रश्नावर कृषी मंत्री मुंडे थेट केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना भेटून आले आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष नाही असे म्हणता येणार नाही, असे सांगत वेळ मारुन नेली.

नाशिक(Nashik) जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. तीन महिने झाले तरी पाऊस पडलेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी राज्याचा दौरा करणे अपेक्षित होते. पण ते स्वत:च्या मतदारसंघात पक्षाची सभा घेण्यात व्यस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असेच या वर्तनावरुन दिसून येते, असा प्रश्न पालकमंत्री दादा भुसें (Dada Bhuse) पत्रकारांनी विचारला.

Dada Bhuse
MLA Santosh Bangar News : ठाकरेंनी गाडून टाकण्याची भाषा केली, अन् बांगरांचा जोश अजूनच वाढला..

यावर मंत्री भुसेंनी असे काहीही नसल्याचे म्हटले. कांदा प्रश्नावर त्यांनी लागलीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल(Piyush Goyal) यांची भेट घेतली. त्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी आता बाजार समितीतून कांदा खरेदी करावा, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dada Bhuse
Rupali Chakankar News : राखी पौर्णिमेला 'महिला धोरणा'ची बहिणींना भेट ! रुपाली चाकणकरांचे संकेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात आढावा बैठक घेतली होती. तेव्हा कांदा चाळीला अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली. यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती घ्यावी लागेल, असा खुलासा पालकमंत्री भुसेंनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com