Yeola news; आमदार दराडेंना धक्काबुक्की करणाऱ्या पीआय मथुरे यांची होणार चौकशी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा; आमदार दराडेंनी मांडली होती लक्षवेधी
Kishor Darade & Devendra Fadanvis
Kishor Darade & Devendra FadanvisSarkarnama

येवला : (Yeola) एखाद्या अधिकाऱ्याने कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अवमान करणे गंभीर आहे. त्यामुळे शहर पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे (PI Bhagwan Mathure) यांची सात दिवसात वरिष्ठांमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, तसे निर्देश दिले आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. (MLAKishor Darade put a question in assembly session in Nagpur session)

Kishor Darade & Devendra Fadanvis
Pune Municipal Corporation : दिल्लीतून आलेल्या अधिकाऱ्यांनी उडविले पुणे महापालिकेच्या कामाचे धिंडवडे

येवला येथे १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया सुरु असताना शहर पोलिस निरीक्षक श्री.मथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रगती पॅनल प्रमुख व इतरांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या घरी काही कारण नसताना पोलिसांना दोन तास बसवून ठेवले, अशी तक्रार होती.

Kishor Darade & Devendra Fadanvis
Rupali Patil-Thombare : रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध; शहराध्यक्षांनीच टोचले कान !

भाजपचे नगरसेवक प्रमोद सस्कर यांनाही धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. याशिवाय आमदार दराडे यांना एकेरी भाषा वापरून सदर ठिकाणाहून निघून जाण्याबाबत दम दिला. केंद्रावरच हुज्जत घातली. या निवडणुकीत विरोधी पॅनलला पाठीशी घातले. यामुळे शहरात पोलिस निरीक्षकांच्या विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

शहरात लोकप्रतिनिधीच जर अशा अधिकाऱ्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेला हे कसे संरक्षण देणार, अशी भावना असून लोकप्रतिनिधीचा अवमान केलेला असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी दराडे यांनी केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सदरच्या अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधीच्या सोबत वागणे निश्चितच चुकीचे व गैर असून याबाबत मी स्वतः देखील गंभीर आहे.या अधिकाऱ्यांची वरिष्ठ यांच्यामार्फत सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. श्री. दराडेंनी निलंबनाचा आग्रह धरल्यावर फडणवीस म्हणाले की, अशा कारवाईत अधिकारी मॅट किंवा न्यायालयामार्फत स्थगिती मिळवतात. त्यामुळे चौकशी करूनच कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी मी स्वतःच गंभीर असल्याने असे प्रकार गैर असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदरच्या अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातून तत्काळ बदली करण्याची मागणी केली. यावरही फडणवीस यांनी चौकशीला

अडथळा नको म्हणून त्यांची पोलिस ठाण्यातून त्वरित बदलीची घोषणा केली. आमदार नरेंद्र दराडे यांनीही यात लक्ष वेधत जिल्हा पोलिस प्रमुख शहाजी उमप व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व अवैध धंदे बंद केले असल्याचे कौतुक करत येवल्यातील धंदे कसे सुरू आहे? या अधिकाऱ्याला कोणाचा पाठिंबा आहे. याची चौकशीची मागणी केली. यावर फडणवीस यांनी त्यांना कोणाचा पाठिंबा आहे याचीही चौकशी करण्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com