NEET Exam Paper Leak : कमी हुशार पण पैशाने श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा अन्.. शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी समोर

How Shubham Khairnar Allegedly Targeted Wealthy NEET Aspirants : नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन पोलिसांनी शुभमला अटक केली होती.
NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Casesarkarnama
Published on
Updated on

NEET Exam Paper Leak : NEET 'नीट' पेपरफुटी प्रकरणात पहिली अटक नाशिकमध्ये झाली होती. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून शुभम खैरनार याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकत त्यानंतर सीबीआयच्या हवाली केलं होतं. तपासातून, शुभम खैरनारची गुन्हेगारीची 'मोडस ऑपरेंडी' समोर आली आहे.

शुभम खैरनारचे मुख्य टार्गेट हे अभ्यासात कमी हुशार किंवा ढ मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत असणारे विद्यार्थी असायचे. ज्या पालकांकडे अफाट पैसा आहे आणि ज्यांना आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत 'डॉक्टर' बनवायचे आहे, अशा बड्या विद्यार्थांना शुभम शोधायचा. श्रीमंत पालकांवर त्याचा डोळा असायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे.

पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणारे पालक त्याच्या टार्गेटवर असायचे. शुभम त्यांच्याशी लाखो रुपयांची डील करायचा अशी माहिती सूत्रांकडून कळाली आहे. शिवाय त्याच्या भावाची देखील गुन्हेगारी पार्श्भूमी तपासातून समोर आली आहे. बेकायदेशीरपणे गावठ्ठी कट्टा बाळगल्याबद्दल त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल आहे.

NEET Paper Leak Case
NEET Exam Paper Leak: NEET पेपर लीकनंतर नाशिक पुन्हा चर्चेत; तीस वर्षांपासून पेपरफुटीचे केंद्र म्हणून बदनाम

दरम्यान, शुभमच्या थेट संपर्कात असलेल्या नाशिकमधील क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या हायटेक रॅकेटमध्ये नाशिकसह राज्यातील काही नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात असून अनेक मोठे चेहरे सीबीआयच्या रडारवर आहेत.

विद्यार्थी व पालकांना परीक्षेआधीच मूळ प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून शुभमने 15 ते 20 लाख रुपयांची डील करत केली होता. परीक्षा ३ मे'ला होती मात्र, 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता, असा संशय आहे. शुभमने हा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला आणि पुढे तो श्रीमंत विद्यार्थ्यांना 15 लाख रुपयांना विकला. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली होती. इन्स्टाग्राम हेच प्रश्नपत्रिका लीक करण्याचे माध्यम होते अशी माहिती समोर आली आहे.

NEET Paper Leak Case
NEET Exam Paper Leak: NEET पेपर लीकनंतर नाशिक पुन्हा चर्चेत; तीस वर्षांपासून पेपरफुटीचे केंद्र म्हणून बदनाम

शुभमच्या नाशिकमधील कार्यालयात आणि घरी नेमके कोण-कोण लोक भेटायला येत होते याची पाहणी करण्यासाठी सीबीआय कडून CCTV फुटेजची सखोल तपासणी होत आहे. तसेच शुभमशी प्रत्यक्ष, सोशल मीडिया आणि दूरध्वनीद्वारे सातत्याने किंवा संशयास्पदरित्या संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचा तपास सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शुभमशी संपर्कात आलेले लोकही चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com