
Maharashtra Politics : एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खडसे शरद पवार यांच्यासोबत राहिले. दरम्यान त्यांनी अनेकदा भाजपमध्ये पुन्हा जाण्याचे प्रयत्न केले. पण काही ना काही कारणाने त्यांचा भाजप प्रवेश रखडला. आता खडसेंना पुन्हा एका पक्षाची ऑफर आली असून राजकीय वर्तुळात त्याचीच चर्चा सुरु आहे.
जळगाव मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री आणि बाबासाहेब पाटील यांनी एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या ऑफरला दुजोरा ही दिला आहे.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्र्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा बॅंकेत भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी चेअरमन संजय पवार, व्हाईस चेअरमन आमदार अमोल पाटील, अनिल पाटील, गुलाबराव देवकर, अॅड. रोहिणी खडसे, चिमणराव पाटील, राजीव देशमुख, अॅड. रवींद्र पाटील, शैलेजा निकम, जनाबाई महाजन, नाना महाजन, घनःश्याम चौधरी, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान सहकार मंत्र्यांनी दिलेल्या या ऑफरवर बोलताना, जर शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर आपणही त्यांच्या बरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. असे आश्वासन आपण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना देत आहोत असं खडसे यावेळी म्हणाले. दरम्यान ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्याचवेळी अजित पवारांसोबत येण्याची अमोल मिटकरींनी आपल्याला ऑफर दिली होती असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना जमीन घोटाळा प्रकरणी त्यांना महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणामुळे त्यांचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध तणावपूर्ण झाले. खडसे हे वेळोवेळी आपल्या सरकारवरच टीका करताना दिसले. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर खडसेंना विधानपरिषदेवर स्थान मिळाले, मात्र ही फेरी फारशी यशस्वी ठरली नाही. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू केले. दिल्लीत नेत्यांशी गुप्त भेटी घेतल्या, तरीही भाजपमध्ये त्यांची पुनःएन्ट्री अद्याप होऊ शकली नाही. अशात त्यांना आता अजित पवार गटाची पुन्हा एकदा ऑफर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.