Jalgaon Politics: जळगावच्या राजकारणात दोन सत्ता केंद्र नको! खडसेंच्या भाजप प्रवेशाचा गिरीश महाजन समर्थकांना धसका?

Eknath Khadse News: एकनाथ खडसे भाजप प्रवेशाचा विषय आता मागे पडला आहे. मात्र या चर्चेने जळगाव भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती, हे लपून राहिलेले नाही.
Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khadse vs Mahajan News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे स्वगृही भाजप पक्षात परतण्याची चर्चा मागे पडली आहे. मात्र या चर्चेने मंत्री गिरीश महाजन समर्थ सक्रिय झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकतीच एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे स्वगृही परतणार का? अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. या चर्चांचे खडसे यांनीच खंडन केले होते.

माजी मंत्री खडसे यांनी आपण भाजप प्रवेश करणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार, विनोद तावडे यांच्या भेटीत कोणतेही राजकीय संदर्भ नव्हते असे स्पष्ट केले.

खडसे यांच्या संदर्भ आला की मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख ओघाने होतोच. आत्ताही तसेच झाले आहे. खडसे आणि महाजन यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे ही चर्चा सुरू होताच महाजन समर्थक आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

Eknath Khadse, Girish Mahajan
High Court Judgment: मंजुरीशिवाय रजेवर गेलात तर ग्रॅच्युइटी, पेन्शन रोखता येणार का? उच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मंत्री महाजन अनुपस्थित होते, त्यांच्या वतीने चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली, असे कळते.

खडसे यांचा भाजप प्रवेश झाल्यास पक्षात जळगावच्या राजकारणात विभागणी अटळ आहे. विशेषता जळगावच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या लेवा पाटील समाजात खडसे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाल्याचे कळते.

Eknath Khadse, Girish Mahajan
LPG Cylinder: 19 किलोच्या सिलिंडरला पर्याय; आता 10 किलोचा सिलिंडर येणार? छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा

मुंबईत झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे सत्ता केंद्र मंत्री महाजन आहेत. खडसे यांचा प्रवेश झाल्यास त्याला आव्हान दिले जाऊ शकते. त्यात महाजन समर्थकांची गैरसोय होणार. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जळगावच्या राजकारणात दोन सत्ता केंद्र नको, अशी भूमिका घेण्यात आली.

खडसे यांच्या भाजप प्रवेशाला त्यामुळेच मोठा विरोध झाला. मुंबईत झालेल्या बैठकीत देखील खडसे यांच्या प्रवेशाला विरोध करण्याचे ठरले. त्यामध्ये मंत्री महाजन यांचे समर्थक आमदार चव्हाण यांचा पुढाकार होता. खडसे भाजप प्रवेशाचा विषय आता मागे पडला आहे. मात्र या चर्चेने जळगाव भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती, हे लपून राहिलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com