Muktainagar municipal election : शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाचं बोगस मतदान, आमदाराची गुंडगर्दी; एकनाथ खडसेंना वेगळीच भाती!

Eknath Khadse Complains to EC Against Shiv Sena Chandrakant Nimba Patil in Muktainagar Election : एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांच्या दहशतीच्या प्रकारावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
Eknath Khadse Complains
Eknath Khadse ComplainsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon election news : जळगावमधील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या आज मतदानावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांच्या बाईक-कार रॅलीच्या दहशतीनं गाजली. तसंच शिवसेनेच्या शाखाप्रमुख मुलगा आणि त्याचा साथीदार कार्यकर्ता, अशा दोघा शिवसैनिकांना बोगस मतदान करताना पकडलं गेलं.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असली, तरी कुठं मतदान केंद्र हायजॅक झाल की काय, अशी भीती व्यक्त केली आहे.

मुक्ताईनगरमधील एकनाथ शिंदे शिवसेना (ShivSena) पक्षाचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी शंभर दुचाकी अन् कार घेऊन नगरपंचायत निवडणुकीच्या आज मतदानादिवशी रॅली काढली. ही रॅलीमध्ये मुक्ताईनगरमध्ये आमदारांची गुंडागर्दी अन् दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा घणाघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. या रॅलीचे व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. तसंच मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत कसं बोगस मतदान झालं, त्यांची नाव घेऊन, एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, "बोगस मतदानाचे प्रकार घडले आहेत. जे दोन बोगस मतदार पकडले आहेत ते कट्टर शिवसैनिक आहेत. सागर रवींद्र बडे याचे वडील रवींद्र बडे हे सालबर्डी इथं विद्यमान शाखाप्रमुख आहेत. अमोल प्रमोद बडे हा देखील इथं शिवसैनिक पकडण्यात आला आहे. म्हणजेच कुणाचे माणसं बोगस मतदान करतायेत हे स्पष्ट होत आहे. शाखाप्रमुखाचा मुलगा बोगस मतदान करताना पकडला गेलेला आहे. मी पोलिसांना स्पष्ट सांगितले आहे की, इथं कडक कारवाई झाली पाहिजे."

Eknath Khadse Complains
Rahata municipal election : सुरुवातीला एक 'ईव्हीएम' दाखवण्यात आलं, नंतर तिथं दुसरंच ठेवण्यात आलं; राहाता इथल्या प्रकारावर थोरातांच्या दाव्यानं खळबळ

शंभर दुचाकींच्या रॅली पुढे आमदार

इथं मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आहे. आमदार आणि त्याचे साथीदार शहरांमध्ये कशी गुंडगिरी पसरवत आहेत, याचे चित्रीकरण एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. आमदार पुढे आहे आणि त्याच्या पाठीमागे शंभर दुचाकीवर त्याचे साथीदार आहेत. सर्वच्या सर्व लोक हे गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि ते जळगाववरून इथं आणले गेले आहेत. तसंच या दुचाकी रॅलीच्या पाठीमागे पाच ते सहा कार आहेत. त्या देखील जळगावमधील जैनाबाद इथून आणले आहेत. हे सारे गुंड आहेत, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

Eknath Khadse Complains
Santosh Bangar : संतोष बांगरांना निवडणूक आयोगाचा दणका; मतदान कुणाला करायचं हे महिलेला सांगणं अंगलट

मतदान केंद्र ताब्यात घेतील की काय?

'शहरातील दहशतीची पोलिसांना निदर्शनास आणून दिली आहे. पोलिसांनी एसआरपीएफ तिथं पाठवली आहे. गुंडगिरी आणि दहशत यांनीच इथं निर्माण केलेली आहे. आता हेच आरोप करत सुटलेले आहेत. म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा, अशी परिस्थिती इथं आहे. जैनाबाद हा इथला गुंडाचा एरिया आहे. तिथून आणलेले हे गुंड इथं मतदान केंद्र ताब्यात घेतील की काय, अशी मला भीती आहे. मी हा सर्व गुंडांना ओळखतो. आमदाराच्या मागच्या जैनाबाद इथल्या गुंडांच्या कारमध्ये शस्त्र आहेत. याबाबत सगळी पोलिसांना माहिती दिलेली आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये, निवडणुकीच्या काळामधील असे प्रकार पाहिलेले नाहीत. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे. पोलिसांकडे देखील तक्रार केली आहे,' असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

कोण गुंड आहे, याची चांगली माहिती

'आम्हाला शहरातील गुंडगिरी कमी करायचे आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला भाजपचे इथं काही देणे-घेणे नाही.इथं कुठेही आचारसंहिता राहिलेली नाही. मी या संदर्भात गृहमंत्र्यांकडून नाही. परंतु निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोग आता कोणत्या पद्धतीने ॲक्शन घेते, हे मला पाहायचं आहे. मी चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे. पालकमंत्री देखील राहिलो आहे. त्यामुळे जळगावमधील कोण वाळू ठेकेदार, वाळू तस्कर, कोण गुंड आहे, याची मला चांगली ओळख आहे, अन् माहिती देखील आहे,' असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com