Jalgaon Political News : वर्षभरापूर्वी झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना त्यांच्या विरोधातील उमेदवार भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वर्षभरापूर्वी झालेल्या या निवडणुकीत नेमके काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान वर्षभरापूर्वी मंदाकिनी खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण ((MLA Mangesh Chavan) हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली आहे. ती उमेदवारी रद्द करावी, यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती, मात्र ती औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना दिलासा मिळाला होता.
नियमात बदल केल्याचा आरोप
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेल विरुद्ध शिंदे गट आणि भाजपच्या शेतकरी पॅनेलमध्ये लढत झाली. केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या हितासाठी हे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील मतदाराला कोणत्याही तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नियम अंमलात आणून आमदारा मंगेश चव्हण यांचा मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.
असा केला नियमात बदल
तालुक्याच्या मतदारसंघातील यादीत उमेदवाराचे नाव असेल तर त्याच मतदारसंघातून उमेदवारी दाखल करता येते, असा नियम होता. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील उमेदवाराला कोण्यातीही तालुक्याच्या मतदारसंघात निवडणूक लढता येईल, असा नियम करण्यात आला.
हरकत दाखल केली
या नियमानुसार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी राजकीय दबाव आणून ही उमेवारी दाखल केली आहे. विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात विरोधकांना तालुक्यातील उमेदवार न मिळाल्याने राजकीय दबाव आणून उमेदवारी दाखल करण्याचा नियम बदलण्यात आला. याबाबत आपण हरकत दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली
मंदाकिनी खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ती उमेदवारी रद्द करावी यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती, मात्र ती औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली होती. दरम्यान,.एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे जगदीश बढे हे रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून आले होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.