Sugarcane FRP Protest : ऊसदराबाबत आयोजित कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत गोंधळ!

Farmers organizations Meeting : या प्रकरणी ही तिसरी बैठक होती, यामध्ये तरी ऊसदराबाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा होती.
Farmers organizations Meeting
Farmers organizations MeetingSarkarnama
Published on
Updated on

Kolapur News : कोल्हापुरात आज पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. ऊसदराबाबत तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या या तिसऱ्या बैठकीत गोंधळ झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Farmers organizations Meeting
Sugarcane FRP Issue : ऊसतोड बंद आंदोलनाचे लोण मराठवाड्यातही ; एफआरपी पेक्षा अधिकच्या दोनशे रुपयांची मागणी..

काही शेतकऱ्यांनी कारखानदार यांची बाजू घेतल्याने राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, तर ठरवून चर्चा केली जात असल्याचा स्वाभिमानी संघटनेकडून आरोप करण्यात आला आहे.

खरंतर ऊसदरावर तोडगा काढण्यासाठीच्या या तिसऱ्या बैठकीत तरी काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु बैठकीच्या सुरुवातीलाच गोंधळ झाला. काही शेतकऱ्यांनी आम्ही ऊस द्यायला तयार आहोत, परंतु सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं, असं बैठकीत सांगितलं.

Farmers organizations Meeting
Chhagan Bhujbal News : अंबडच्या ओबीसी एल्गार परिषदेला नाशिकमधून मोठे बळ!

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी चिडले आणि हे सगळं अगोदरच तुम्ही ठरवलेलं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय अन्य काही शेतकरी संघटनांनीही बैठकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शांत केले आणि पुन्हा बैठक सुरू झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com