Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार; म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून...'

Sharad Pawar NCP : जाती-जातीतील वादांमुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होईल
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला पुन्हा २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जरांगे पाटलांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी जाहीर विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरोधात ओबीसी समाज असे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यावरून राज ठाकरेंनी भाजप नेत्यांसह शरद पवार व मनोज जरांगे यांना स्पष्ट शब्दांत फटकारले आहे. (Latest Political News)

ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. राज्यातील आरक्षणाबाबत ठाकरे म्हणाले, 'जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना आवडते. त्याची कारणे वेगळी असतात. स्वत:च्या जातीबाबत अभिमान असणे हे महाराष्ट्रात पूर्वीपासून होत आहे,' असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला.

Raj Thackeray
Raj Thackeray On BJP : धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, '१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे व्हायला लागले. मी तेव्हा ठाण्यातच म्हणालो होतो असे होऊ लागले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होऊ शकतो. स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्राची इमेजची वाट लावण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्या पक्षात जातीपातीला थारा मिळणार नाही, तसे होताना दिसले तरी मी त्याला पक्षापासून दूर ठेवेन,' असेही ठाकरेंनी या वेळी स्पष्टच सांगितले आहे.

राजकीय परिस्थिती घाणेरडी

'राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भीती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मूर्ख समजतात. पाच वर्षे खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलायचे आणि शेवटी वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे, असे मतदारांनी केल्यास त्यांची किंमत काय राहणार? मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो,' असेही ठाकरे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Raj Thackeray
Maratha Vs OBC : असंच कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; जरांगेंच्या मागणीवर प्रकाश शेंडगे स्पष्टच बोलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com