एकनाथ खडसे सतततच्या पराभवाने खचले आहेत!

भाजपचे नाशिक महापालिका प्रभारी गिरीश महाजन यांचे शहरात उत्साहात झाले स्वागत.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नाशिक : एकनाथ खडसे (Eknath Khadse) हा विषय माझ्या दृष्टीनं संपला आहे. त्यामुळे त्यावर फार भाष्य करण्यात मला रस नाही. खडसे सातत्याने होणाऱ्या पराभवांमुळे खचले आहेत. त्यामुळे ते सध्या भडक विधाने करत असतात. त्याला काहीच महत्त्व नाही, असे भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

Girish Mahajan
राणे अन् मलिकांना वेगळा न्याय का ? शरद पवारांचा भाजपला सवाल

श्री. महाजन यांची भाजपचे नाशिक महापालिका प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आज त्यांचे शहरात आगमण झाले. यावेळी पाथर्डी फाटा येथे त्यांचे उत्साहात स्वागत झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, श्री. खडसेंचे सध्या दररोज काहीतरी भंपक भाषणं करायची असे सुरु आहे. त्यांना सगळीकडे नाकारले आहे, म्हणून ते अशी भडक विधाने करतात. मी त्यांच्या आधी पक्षात आहे, माझ्यामुळे सगळं आहे, मी तुझा बाप आहे, उकिरड्यातुन तुला उचललं ही त्यांची विधाने आहेत. त्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यामुळे ते अशी विचित्र विधान करताय.

Girish Mahajan
पहिलवान खासदार तडसांनी ६८ वर्षे वयातही टाकला ‘डाव’

श्री महाजन म्हणाले, राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मे पर्यंत राज्यातील निवडणूका होतील. नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांमुळे महापालिकेत पुन्हा बहुमत मिळेल. हे गिरीश महाजनांचे भाकीत असुन ते देखील मी नाशिकमध्ये करीत आहे. माझ्यावर नाशिकच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. यावेळस स्पष्ट बहुमत भाजपला मिळेल. जनता पाच वर्षात जी कामे झाली त्यामुळे आम्हाला बहुमत देतील, असा विश्वसा त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण

ते म्हणाले, ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. यामध्ये राज्य सरकारचे पितळ उघडे पडले आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या नाहीत आणि फक्त केंद्र शासनाकडे बोट दाखवायचे ही त्यांची सवय आहे. राज्य सरकारला जो अहवाल द्यायला पाहिजे तो त्यांनी दिला नाही. सरकारला खुर्च्या वाचवायच्या आहेत. दुकानदारी करायची आहे. आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही कुणालाही फंडिंग करत नाही. जो पर्यंत आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, ही आमची भूमिका आहे.

श्री. महाजन प्रदिर्घ काळानंतर शहरात आले होते. त्याबाबत ते म्हणाले, मी महाराष्ट्राच्या बाहेर होतो. आता पाहिल्यादांच आलो आहे. पक्षाने सगळीकडे आता नवीन प्रभारी दिले आहेत. सध्या माझ्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करेल. काय कमतरता आहे , काय करायची गरज आहे त्यानुसार काय करायचे ते बघू. सध्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांच्याकडून दबाव आणला जातो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com