खडसेंच्या दूध संघाचे ८५ रुपयांचे तूप ५८५ रुपयांनी कोणी विकले!

आमदार मंगेश चव्हाण यांनी अध्यक्ष, ‘एमडी’च्या संगनमताने गैरकारभार झाल्याचा आरोप केला.
Bjp MLA Mangesh Chavan& NCP leader Eknath Khadse
Bjp MLA Mangesh Chavan& NCP leader Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघात (District milk federation) लोणी (Butter) व दूध भुकटी प्रकरणात चोरी झालेली नाही, तर तो गैरप्रकार (It is not theft but malpractice) असून, तो अध्यक्ष आणि ‘एमडी’ (कार्यकारी संचालक) यांच्या संगनमताने झाला आहे. संघात खडसे व त्यांच्या परिवाराचे ‘सिंडीकेट’ आहे, (Khadse family`s syndicate) असा आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. (MLA Mangesh Chavan criticise NCP leader Eknath Shinde)

Bjp MLA Mangesh Chavan& NCP leader Eknath Khadse
सरकार तुमचं आहे, गुन्हा दाखल करून चौकशी करा!

जिल्हा दूध संघात लोणी व दूध भुकटी प्रकरणात गैरप्रकार झाल्याची तक्रार आमदार चव्हाण यांनी केली होती. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर याच प्रकरणी संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी लोणी व दूध भुकटी चोरीची तक्रार दिली. ही तक्रार नोंदवून घ्यावी, यासाठी आमदार एकनाथ खडसे यांनी शहर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले.

Bjp MLA Mangesh Chavan& NCP leader Eknath Khadse
राष्ट्रवादीच्या आमदार अहिरेंना झिडकारत शिंदे गटाच्या कार्यक्रमाला उसळली गर्दी

याबाबत शनिवारी आमदार मंगेश चव्हाण यांची अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, की जिल्हा दूध संघात लोणी व दूध भुकटीत झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार आपण मंगळवारी (ता. ११) दिली. मात्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले.

त्यानतर बुधवारी (ता. १२) अध्यक्षा मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र ही तक्रारच गजब आहे. हा अपहार असताना चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिली आहे, वास्तविक चोरी नाही, तर हा गैरप्रकार आहे. संगनमताने रचलेला कट आहे आणि आता चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे.

खडसे परिवाराचे ‘सिंडीकेट’

जिल्हा दूध संघातील अपहार हा ‘खडसे व त्यांच्या परिवराचे सिंडीकेट’ आहे, असा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. एवढा मोठा अपहार केवळ दोन कर्मचारी कसे करू शकतात, त्यांचा केवळ बळी दिला जात आहे. हा सर्व कट आहे. जिल्हा दूध संघात वातानुकूलित यंत्रणा असताना तब्बल साडेचारशे किलोमीटरवर वाई (जि. सातारा) येथे लोणी व दूध भुकटी कोल्ड स्टोरेजमध्ये का ठेवण्यात आली? त्याचे वाहतूक भाडे व इतर भुर्दंडही संघावर उगाचाच पडला आहे. तसेच सी. आर. पाटील निवृतीनंतरही कामावर आहे.

विठ्ठल-रुक्मिणी संस्थेच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाला. ८५ रुपये किलोचे तूप ५८५ रुपये भावाने विकले त्याचा फायदा कुणाला झाला? मोलॅसीस मक्ता, कर्मचारी भरती यातही गैरव्यवहार झाला आहे. स्वीय सहाय्यक खेवलकर याच्या माध्यमातूनही गैरव्यवहार केला आहे, त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास सर्व माहिती समोर येईल, असा आरोपही त्यांनी केला. आज संघ नफ्यात दाखवून सर्व प्रकारचे गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र प्रत्यक्षात आठ कोटींचा तोटा आहे. संघ यांनी लुटून खाल्ला आहे. मात्र या प्रकरणी आपण कादेशीर लढाई लढणार आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

चौकात समोरासमोर या!

आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा दूध संघप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांना खुले आव्हान दिले आहे. या प्रकरणी चर्चेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकाच व्यासपीठावर यावे, जर आपण पुरावे देवू शकलो नाही, तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com