Banners In Jalgaon
Banners In JalgaonSarkarnama

Eknath Khadse On Ayodhya Ram Mandir : भाजपच्या प्राणप्रतिष्ठेला एकनाथ खडसेंचे 'जय श्रीराम'चे सणसणीत उत्तर!

Eknath Khadse As Karsevak : जळगावसह जिल्ह्यात झळकवलेले फलक चर्चेचा विषय
Published on

Jalgaon Politics And Ram Temple Udghatan : अयोध्येतील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्याबाबत भाजपने जाहिरातबाजी केली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही त्याच पद्धतीने सणसणीत उत्तर दिले आहे. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राम मंदिर आंदोलनातील आपल्या सहभागाचे बॅनर खडसेंनी झळकवलेले आहेत. त्यावरून जिल्ह्यात खडसे विरुद्ध भाजप असा थेट वाद होण्याची शक्यता आहे.

अयोध्येत आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्त साधून भाजपने आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी ही यंत्रणा सक्रिय झालेली आहे. भगवे झेंडे, श्रीरामाचे पोस्टर्स आणि फ्लेक्स लावून पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत् होताना दिसत आहे. राज्याच्या सर्व भागात आणि देशभर हेच चित्र पाहायला मिळते. यामध्ये भाजपकडून विरोधकांना डिवचण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

Banners In Jalgaon
Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

याला उत्तर म्हणून विरोधकांनीही राम मंदिर सोहळ्याचे स्वागत करणारे फलक लावले आहेत. यामध्ये जळगाव शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसे यांनी लावलेले फलक चर्चेचा विषय ठरले आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी 1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सक्रिय भाग घेतला होता.

खडसे अयोध्येतील कारसेवेतही अग्रभागी होते. या संदर्भात त्यांनी या सर्व घटनांची आठवण करून देत त्यांच्यासोबत गेलेल्या कारसेवकांची नावेही फलकावर झळकवली आहेत. त्यामुळे ऐन राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादिवशीच जळगावात खडसे आणि रोहिणी खडसेंचे छायाचित्र असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सुरू केलेल्या आक्रमक प्रचाराला खडसे यांनी देखील तेवढेच सणसणीत उत्तर दिले आहे. त्यांनी झळकवलेल्या फलकावर त्यांच्यासह रथयात्रेचा फोटोही पाहायला मिळतात. त्यामुळे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील राजकारणाला फोडणी मिळाली आहे. त्यात खडसे आणि त्यांचे विरोधक यांच्यात या विषयावरून निर्माण झालेली राजकीय स्पर्धा नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Banners In Jalgaon
Ram Temple Consecration : लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील सोहळ्यास जाणार नाहीत; काय आहे कारण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com