Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

Ambadas Danve On BJP : मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, हा प्रश्न उपस्थित होतोय
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ram Temple Politics : आयोध्येत राममंदिराचे उदघाटन होत असले तरी बाबरी मशिद कोणी पाडली, यावरून नेहमीच महाराष्ट्रात राजकारण पहायला मिळालेले आहे. युती धर्मात असताना शिवसेना आणि भाजप यांच्यात बाबरीचा ढाचा पाडण्यावरून दुमत नव्हते. परंतु, युतीत फूट पडल्यापासून बाबरी पाडण्यावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप करत आहे. कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्याचे पुरावे दाखवल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातले, असा तिखट सवाल भाजपाला केला आहे.

सातारा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आले होते. यावेळी उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अंबादास दानवे म्हणाले, तुम्हाला कारसेवक होता की नाही यांचे पुरावे सादर करावे लागत आहेत, यातच सर्व आले. ज्याच्या विषयी मनात शंका निर्माण होते, जो असेल-नसेल असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना पुरावे सादर करावे लागतात, त्याच्यातच आमचे यश आहे. राममंदिराबाबत महाराष्ट्र नव्हे देशाचा आणि जगाचा इतिहास आहे. बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण होत, कुणी शेपूट घातले होते?

Uddhav Thackeray
Ram Temple Consecration : लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील सोहळ्यास जाणार नाहीत; काय आहे कारण ?

बाबरीच ढाचा पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) एकमेव म्हणत होते, यामध्ये माझा शिवसैनिक असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यावेळी सुध्दा भाजपाच्या लोकांनी शिवसैनिक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेला या गोष्टी भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही अंबादास दानवेंनी लगावला. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचा आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा 

सरकारने मराठा समाजाला वारंवार तारखा दिल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली पाहिजे. यासाठी बरेच मार्ग आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. परंतु, महाराष्ट्रातल्या सरकारला आणि केंद्र सरकार यांना ही मागणी पूर्ण करायचे आहे की नाही ? का केवळ समाजा-समाजामध्ये भांडणे लावायचे आहेत, हा प्रश्न सर्वांचा मनात निर्माण होत आहे. मराठा आरक्षणाच्या भूमिकेला शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे, असेही विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Rahul Gandhi: राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले अन् काँग्रेसला राम आठवला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com