Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी फेटाळली 'घरवापसी'ची शक्यता

Politics News : खडसे म्हणाले, आता कोणत्याही स्थितीत भारतीय जनता पक्षात परतण्याची आपली इच्छा नाही
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे (vinod tawde) यांना महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. ते भाजपपासून दुरावलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात सातत्याने मध्यवर्ती भूमिका बजावलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या उभारणीपासून विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते एकनाथ खडसे यांच्या विषयी चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ खडसे (Eknath khadse)पुन्हा भाजपमध्ये स्वगृही परतणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, तावडे यांचा प्रयत्न भाजप मजबूत करण्याचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते विविध प्रयत्न करत आहेत. त्यातूनच त्यांना जुन्या नेत्यांना पुन्हा भाजपच्या प्रवाहात आणण्याची इच्छा असावी. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. मात्र, भाजपने आपला खूप छळ केला आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षात जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही असे सांगितले.

Eknath Khadse
Lok Sabha Election : आचारसंहिता कधीपासून लागणार? अखेर अजितदादांनीच सांगितलं...

खडसे यांच्या भूमिकेमुळे त्यांची पुन्हा भाजपमध्ये परतण्याची शक्यता मावळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभावी यंत्रणा व महाविकास आघाडीसाठी अनुकूल राजकीय परिस्थिती निर्माण करण्यावर भर असल्याचे संकेत त्यांनी दिले.

येत्या काळात जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभावी यंत्रणा राबविणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवर निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीने जागा काँग्रेसला सोडल्यास प्रचार करणार

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 'इंडिया' आघाडीचा घटक पक्ष काँग्रेसने आपली दावेदारी केली आहे. या पक्षाकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील इच्छुक आहेत. याविषयी खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडल्यास पूर्ण परिश्रम करून आपण काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sachin Waghmare)

Eknath Khadse
Eknath khadse: गिरीश महाजनांना आव्हान देत नाथाभाऊंनी फुंकले लोकसभेचे बिगुल !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com