भाग्यश्री प्रधान आचार्य
Kalyan News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ही निवडणूक कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडणुकीबाबत सुतोवाच केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होणार असल्याचे विधान पवारांनी केले आहे.
कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पवारांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाबाबत संकेत दिले आहेत. अजितदादांनी (Ajit Pawar) यावेळी बोलताना नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांना मेहनत घेण्याचेही आवाहन केले. एकीकडे मोचींचे कौतूक करत असताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला.
84 चे झाले तर थांबेना
वय झाल्यानंतर थांबायचं असतं. पण काही काही जण ऐकत नाही. हट्टीपणा करतात. 84 झाले तरी तुम्ही थांबेना. अरे काय हे. कुठे चुकलो तर सांगा ना. पण नाही, अशी टीका अशी टीका अजित पवारांनी शरद पवारांवर केली. त्यांनी यापूर्वी अनेकदा शरद पवारांवर त्यांच्या वयावरून निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उध्दव ठाकरेंना टोला
मी सकाळी लवकर काम करायला सुरुवात करायचो. मंत्रालय ठप्प झाला तर काय होईल. शेवटी मंत्रालय आणि यंत्रणा हलविण्याची ताकद असावी लागते, अशा टोला पवारांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. राज्याचं हित हीच आमची भूमिका आहे. काही जण माझ्याबद्दल चर्चा करतात. मी त्याला महत्व देत नाही. मी विकासाला महत्त्व देतो. मी उद्यापासून प्रत्येक जिल्ह्याला निधी कसा मिळेल यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पवार म्हणाले.
पक्ष शिस्तीत चालला पाहिजे
एकदा घेतलेल्या निर्णयापासून बाजूला जायचं नाही. जाती पातीच आणि नात्या गोत्याच राजकारण करायचं नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधन करायचे आहे. चुकीच्या गोष्टींना पांघरूण घालायचे नाही. कोणीही असो पक्ष शिस्तीत चालला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.