Eknath khadse: गिरीश महाजनांना आव्हान देत नाथाभाऊंनी फुंकले लोकसभेचे बिगुल !

Girish Mahajan Vs Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी संकटमोचक गिरीश महाजन यांना खिंडीत पकडले.
Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत दिले. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना थेट आव्हान दिले आहे. नाथाभाऊंनी आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी मनसोक्त राजकीय गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आपले कट्टर विरोधक आणि भाजपचे संकटमोचक महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला.

मंत्री महाजन यांनी नुकतेच खडसे यांना लोकसभेची उमेदवारी करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत खडसे यांनी मंत्री महाजन यांनी आपल्या विरुद्ध लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची हिम्मत दाखवावी. त्यांची तयारी असेल तर समोरासमोर निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या खडसे विरुद्ध महाजन या पारंपारिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Khadse and Girish Mahajan
Jalgaon Political : गिरीश महाजनांनी पळ काढू नये..! लोकसभेसाठी एकनाथ खडसेंचे आव्हान...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जळगावमध्ये झालेल्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांची लोकसभेसाठी उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे, महाजन यांनी देखील रावेर मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान दिले.

रावेर मतदारसंघात सध्या खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत. रक्षा खडसे यांनी यापूर्वीच उमेदवारी करण्याची इच्छा भाजपकडे व्यक्त केली आहे. मात्र, खडसे विरुद्ध महाजन या राजकारणाचा फटका खासदार रक्षा खडसे यांना बसला असून त्यांना उमेदवारी न देण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यावरून रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार रक्षा खडसे यांनी अप्रत्यक्षपणे ग्राम विकास मंत्री महाजन यांच्यावर शरसंधान केले होते. या पार्श्वभूमीवर आता खडसे यांनी दिलेल्या आव्हानाने ग्रामविकास मंत्री महाजन यांची लोकसभा निवडणुकीवरून राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Eknath Khadse and Girish Mahajan
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना दणका; आयकर विभागाची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com