Sharad Pawar NCP : मोठी बातमी! शरद पवारांच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य, पक्षाची ताकद कमी म्हणत दिले न लढण्याचे संकते?

Local Body Elections : राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकींचा बिगूल वाजला आहे. आता उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरुवात झाली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीत पक्ष संपूर्ण निवडणूक टाळूही शकतो.

  • मुक्ताईनगरमधील स्थानिक राजकारणावर या वक्तव्याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

  • ही घोषणा पक्षाचे जेष्ठ नेत्यांनी भुसावळ येथे बोलताना केली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Jalgaon News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजले असून नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकींच्या मोर्चे बांधणीला आता वेग आला आहे. अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी कंबर कसली आहे. पण मुक्ताईनगरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांना निवडणूक लढण्यासारख्या जागा न मिळाल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ असे म्हटले आहे. ते भुसावळमध्ये बोलत होते. त्यांच्या या घोषणेमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात सध्या नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकींला वेग आला असून अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या आपल्या पद्धतीने मोर्चे बांधणीला लागले असून युत्या आणि आघाड्या केल्या जात आहेत. तर अनेक ठिकाणी प्रमुख राजकीय पक्ष स्वबळाची चाचपणी करताना दिसत आहेत. अशातच पक्षांतरामुळे घाईला आलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अनेक मोठे धक्के दिले आहेत. खडसेंच्या समर्थकांचे आमदार पाटील यांच्या उपस्थितीतच पक्षप्रवेश अद्यापही सुरू आहेत. यामुळेच एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येथे आपल्या पक्षाची राजकीय ताकद निर्माण झाली नसल्याचे सांगितले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar
Local Body Election : भाजपकडून मोठी कारवाई! मादनाईकांना कट्टर विरोधकांची मैत्री भोवली, पक्षाने नोटीस धाडत दिली तंबी

त्यांनी, आपल्या पक्षाची ताकद ज्या पद्धतीने ग्रामीण भागात आहे. तशी शहरात म्हणावी तशी नाही. यामुळे येथील मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणुकीत मोजक्या चार-पाच जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार आहे. ज्या आपण जिंकू. मात्र येथेही तसे चित्र नाही दिसल्यास निवडणूकही लढविणार नाही. मात्र दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद असलेली भुसावळ नगरपालिका स्वबळावर लढण्याचा घोषणा त्यांनी केली आहे.

त्याच्या या घोषणेमुळे आता पक्षाची झालेली वाताहत पाहता राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही. यामुळेच जेष्ठ नेते खडसे यांनी अशी घोषणा केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. तर खडसे यांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते? पक्ष ही निवडणूक लढवणार का? की माघार घेणार याची उत्तरे आता लवकरच समोर येणार आहे.

Sharad Pawar
Local Body Election 2025: पक्षाचे तिकीट न मिळालेल्यांना एसटीची हटके ऑफर! दिलीप वळसे पाटलांनाही हसू आवरता आले नाही!

FAQs :

1. एकनाथ खडसेंनी नेमकं काय जाहीर केलं?

खडसे यांनी सांगितले की राष्ट्रवादी मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक फक्त काही जागांवर लढवेल किंवा कदाचित निवडणूक लढवणारच नाही.

2. त्यांनी असा निर्णय का घेतला?

त्यांच्या मते पक्षाची ताकद शहरात कमी असून ग्रामीण भागात जास्त असल्याने हा निर्णय रणनीतीनुसार घेतला जात आहे.

3. निवडणूक न लढवल्यास परिणाम काय होतील?

स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

4. हा निर्णय अंतिम आहे का?

अद्याप हा संकेत आहे; अंतिम निर्णय पक्षस्तरावर होईल.

5. हा निर्णय कोणत्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला?

हा खुलासा त्यांनी भुसावळ येथे बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com