.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Eknath Khadse & Girish Mahajan : नर्मदा पाणी वाटपावरून विधानपरिषदेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली. नदीचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल करत गेली 45 वर्षे गुजरात महाराष्ट्रच्या वाट्याचे 11 टीएमसी पाणी वापरत आहे. आणि आपण ते पाणी अडवलं नाही तर गुजरात यापुढेही ते वापरत राईल. हे थांबले पाहिजे. ते कधी थांबवणार याचं उत्तर द्या अशी मागणी खडसेंनी केली.
गुजरात महाराष्ट्राचे पाणी आणखी किती वर्ष वापरणार आहे. नंदुरबारच्या आदिवासींना आजही पाणी मिळत नाही. एका एका थेंबासाठी भांडणे सुरू आहेत. 11 टीएमसी पाणी हे काही कमी पाणी नाही, 45 वर्ष ते आम्हाला वापरता आलं नाही ते आमचं दुर्देव आहे. परंतु आता तरी सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी असं खडसे म्हणाले.
दरम्यान यांसदर्भात करार झाल्याचे खडसे म्हणाले त्यावरुन महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडलं. ते म्हणाले करार मला समजलाच नाही तो सापडलाच नाही. खडसेंनी व्यवस्थित अभ्यास करुन बोलवं त्यानंतर मी उत्तर देईल. कारण हा करार नसून लवाद आहे. असं महाजन म्हणाले. त्यावर हा प्रश्न लवाद, करार किंवा टिंगलबाजीचा नाही, मी आधीच सांगितलं आहे की, मला ज्ञान नाही मी अज्ञानी आहे. पंरतु हा प्रश्न 11 टीएमसी पाण्याचा आहे, आदिवासी पट्ट्यातील लोकांचा प्रश्न आहे. गुजरात आणखी किती वर्ष हे पाणी वापरणार हा आमचा प्रश्न आहे. माझ्याकडे करार नाही पण गॅजेट आहे. मी ते वाचून दाखवले आहे असं खडसे म्हणाले.
महाजन म्हणाले, निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 10.89 टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागाला देण्यासाठीची प्रक्रिया येत्या एक वर्षात पूर्ण केली जाईल.
नंदुरबार जिह्यातील धडगाव, अक्कलकुवा हे भाग डोंगराळ असल्याने पाणी अडवण्यात अडचणी आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. याच्या सर्व मंजुऱ्या आठ ते दहा महिन्यांत देण्यात येतील आणि येत्या एक वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे महाजन म्हणाले.
यावेळी शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान, तापी आणि नर्मदा नदीचे पाणी मिळवण्यासाठी बोगदा कधी तयार करणार? सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.