अखेर मलिकांकडून पिक्चरच्या 'दि एंड'ची घोषणा

मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. एनसीबीतील एका अधिकाऱ्याच्या निवावी पत्रामध्येही वानखेडे यांच्यासह एनसीबीने खोटे गुन्हे दाखल केलेली 26 प्रकरणे दिली आहेत. वानखेडे यांच्याकडून चुकीच्या पध्दतीने हे गुन्हे दाखल केल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. हे आरोप कधी थांबणार, यावर मलिकांनी स्पष्ट केलं आहे.

मलिकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत वानखेडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. त्याचप्रमाणे भाजपलाही सूचक इशारा दिला आहे. यावेळी मलिकांना हा पिक्चर कधी संपणार असे विचारले असता त्यांनी इतक्यात या पिक्चरचा दि एंड होणार नसल्याचे संकेत दिले. हिवाळी अधिवेशनात विस्फोटक माहिती सादर करणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले.

Sameer Wankhede, Nawab Malik
हिवाळी अधिवेशनात मलिक टाकणार भाजप नेत्यांवर बॉम्ब

वानखेडे यांची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय हे थांबणार नाही. खोट्या गुन्ह्यातील निर्दोष लोक तुरूंगातून बाहेर येईपर्यंत हा पिक्चर सुरूच राहीलल, असा इशाराही मलिक यांनी दिला. हे सर्व कायद्याच्या मार्गाने होईल, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

दरम्यान, नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचाही थेट हात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विस्फोटक माहिती सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Sameer Wankhede, Nawab Malik
आर्यनला अटक ते जामीन अन् बहीण सुहानाचे केवळ तीनच शब्द...

मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर टीका केली जाईल. आरोप केले जातील. पण मीही त्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत आहे. माझ्याकडे काही नेत्यांविषयी विस्फोटक माहिती आहे. या माहितीनंतर काही भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं टीकास्त्र मलिक यांनी सोडलं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची पार्टनशीप आहे. एका खासगी कंपनीत त्यांची पत्नी व गोसावी संचालक असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या नेत्याचं नावही अधिवेशनात उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणाशी काही भाजप नेत्यांचा संबंध असल्याचा थेट आरोपही मलिक यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com