Video Eknath Shinde : घासून नाही तर ठासून...शिवसेनेचे बालेकिल्ले आपण जिंकले! मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले

Shivsena Foundation Day 2024 Eknath Shinde : बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला राहिला नाही, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

Shivsena Foundation Day 2024 : खरी शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेने दिला आहे. शिवसेनेचे बालेकिल्ले असणारे कोकण, ठाणे, संभाजीनगर, कल्याण आपण जिंकले. आपणच खरी शिवसेना आहोत. उबाठाला 60 लाख मतं आहेत आपल्याला 62 लाख मतं आहेत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

आज उबाठा शिवसेनेच्या मेळाव्यात तमाम हिंदू मातांनो बोलण्याचे धाडस केलं नाही. तुमचं कसलं हिंदुत्व आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचे अधिकार तुम्हाला राहिले नाही. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला राहिला नाही, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

शिवसेनेची 19 टक्के मते होती. त्यातील 14.50 टक्के मतदार आपल्याकडे आली फक्त साडेचार टक्के मतं त्यांच्याकडे राहिली. ही तात्पुरती आलेली सुज आहे. एकनाथ शिंदे संपणार, असे काही जण बरळत होते. पण या राज्याच्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा एकनाथ शिंदे संपणार नाही,असा टोला देखील उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde लगावला.

Eknath Shinde
Uddhav Thackeray 0n Shivsena Foundation Day : 'पुन्हा मोदींसोबत जाणार का?' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

धनुष्यबाण बाण पेलण्याची ताकद आपल्या शिवसेनेची Shivsena आहे. ते येवढे कसले लाचार, मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. आपण लोकसभेच्या सात जागा जिंकलो अजून दोन तीन जिंकलो असतो, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून महायुतीची जबाबदारी माझी आहे. महायुती ताकदीने पुढे नेण्याची माझी जबाबदारी. तुमच्या साथीने ही जबाबदारी मी पार पाडेल, असा मला विश्वास आहे. या सगळ्या वावटळीमध्ये या एकंदरी राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मतदार शिफ्ट झाल नाही. तो धनुष्यबाणासोबत राहिला, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Shivsena Foundation Day 2024 : मुंबई, मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा, दरारा कायम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com