जळगाव : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट राज्यात सध्या सत्तेवर आहे. या दोन्ही गटाने युती करून निवडणका लढविण्याचे ठरविले आहे, त्यामुळे दोन्ही गटाचे मंत्री संयुक्त सभा घेणार आहेत, त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथून आज (ता. २० सप्टेंबर) होत आहे. (Eknath Shinde and Girish Mahajan will arrive in Jalgaon in the same flight)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात पाळधी येथे विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा त्यांच्या सोबत मुंबई येथून विमानाने येणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमात ते त्यांच्या सोबत असणार आहेत. तसेच, त्यांच्या सोबतच विमानाने पुन्हा मुंबईला जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळे महाजन आणि मुख्यमंत्री शिंदे हे खडसे यांच्यावर काय बोलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. शिंदे गट व भाजप यांच्या युतीची जळगावातील ही पाहिलीच सभा असणार आहे.
गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तर फडणवीसांमुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असा हल्लोबाल खडसे करत असतात. त्यातूनच महाजन-खडसे यांच्यातून राजकीय विस्तवही जात नाही. हे दोन्ही नेते संधी मिळेल तिथे एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. त्यामुळे मुक्ताईनगरध्ये येऊन शिंदे-महाजन खडसेंच्या कशा पद्धतीने हल्लाबोल करतात, हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.