Eknath Shinde : अजित पवार यांना शॉक; शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले उमेदवार!

Shinde Candidates Oppose NCP Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरे यांच्या विरोधात शिंदे यांचे उमेदवार
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. महायुतीसाठी हा धक्क्याचा दिवस ठरला.

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे आज स्पष्ट झाले. विशेषतः जागा वाटपात भाजपने सर्वाधिक जागा घेतल्यानंतर त्या खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कमी जागा देऊनही शेवटच्या क्षणी महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला पुन्हा एकदा धक्का दिला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटचे काही तास शिल्लक असताना नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन उमेदवार जाहीर केले. विशेषतः विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात देवळाली मतदारसंघात राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचा एक तास शिल्लक असताना हे सर्व घडले. श्रीमती अहिरराव या शेवटचीकाही मिनीटे असताना अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या.

Eknath Shinde, Ajit Pawar
Vasant Gite : "नाशिकला ड्रग्सच्या विळख्यात टाकणाऱ्या `बडी भाभी`ला जनता धडा शिकवेल"

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला राजकीयदृष्ट्या माहिती लागून देता शिंदे गटाने हा गनिमी डाव खेळला. मुख्यमंत्री शिंदे गटाने दिलेल्या उमेदवारांमुळे अजित पवार यांच्या आमदार सरोज आहे रे आणि आमदार नरहरी हिरवळ यांची राजकीय कोंडी होणार आहे.

या निमित्ताने महायुतीमध्ये बंड झाले आहे. महायुतीच्या प्रत्येक पक्षाने एकमेकांच्या विरोधात उमेदवारी आणि बंडखोरी करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फटका आता विविध उमेदवारांना बसत आहे. त्यामुळे आज वादाची ठिणगी पडली.

देवळाली मतदारसंघात आमदार अहिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार म्हणून उमेदवारी निश्चित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये येथे उमेदवारीसाठी चढाओढ सुरू होती.

Eknath Shinde, Ajit Pawar
Girish Mahajan : आमदार व्यासपीठावर म्हणाले, `आय लव्ह यू...` अन् सुरू झाली जळगावात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात आला होता. मात्र शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दबाव टाकून अक्षरश: तो मतदारसंघ हिसकावून घेतला.

देवळाली मतदारसघात माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने आमदार सरोज आहे रे यांची अडचण होण्याची शक्यता आहे. आता या मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची यंत्रणा किती प्रभावीपणे काम करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com