Eknath Shinde politics: एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सभेत शरद पवारांचे ‘ते’ रेकॉर्ड आपल्या नावावर खपवले!

Eknath Shinde; Dy CM Shinde quotes wrong political refrances in Nashik-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या आभार दौऱ्यात दिलेल्या चुकीच्या संदर्भांची होते आहे चर्चा.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे नाशिक मध्ये आभाराची सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. मात्र त्या नादात त्यांनी अनेक चुकीचे संदर्भ दिले. त्यामुळे त्यावर चर्चा तर होणारच.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकला जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यासाठी शक्यते सर्व त्यांनी केले. पक्षाचे सबंध यंत्रणा त्यासाठी कामाला लावली होती. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला संपवा, असे आवाहन केले.

Eknath Shinde
Rajabhau Waje Politics: नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे; खासदार राजाभाऊ वाजे यांचा मंत्री विखेंना लाल झेंडा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्साही भाषणात संदर्भ देताना मात्र त्यांचा गोंधळ झाला. नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. हे रेकॉर्ड आहे. एवढे यश यापूर्वी कोणालाच मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला.

Eknath Shinde
Eknath Shinde Politics: फडणवीसांंच्या बैठकीकडे पाठ फिरवलेल्या शिंदेंचं नाशिकमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रत्यक्षात १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील 'पुलोद'ला नाशिक जिल्ह्यात सर्व १५ जागांवर विजय मिळाला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचे ‘ते’ रेकॉर्डही आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला.

हिवाळा पाडा (त्रंबकेश्वर) या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत किशोर गावित हे हरहुन्नरी शिक्षक शाळा चालवतात. त्यात त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. येथील आदिवासी मुले एकाच वेळी दोन्ही हातांनी दोन भाषांत फळ्यावर लिहीतात. राज्यघटना त्यांना तोंडपाठ आहे. गेली दहा वर्ष ही शाळा चर्चेचा विषय आहे.

(कै) डॉ. वसंतराव पवार यांच्याशी संबंधीत नीलवसंत फाऊंडेशन संस्थेने पाच वर्षांपूर्वी या शाळेला प्रकाशात आणले होते. अनेक संस्थांनी तिचा गौरव केला आहे. मात्र या शाळेचे सर्व श्रेय बिनदिक्कत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी मंत्री शालेय शिक्षण मंत्री झालेल्या दादा भुसे यांना देऊन टाकले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी सर्व महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. अद्याप एकही निवडणूक झालेली नाही. सर्व महापालिका आणि नगरपालिकांवर प्रशासक आहे. मात्र शिवसेना शिंदे पक्षाचे विजय करंजकर यांनी भगूर नगरपालिकेची निवडणूक जिंकून सत्ता मिळवली, असा दावा केला. यावेळी तर चक्क व्यासपीठावरच कुजबुज झाली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला मंत्री दादा भुसे आणि गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, संपर्क नेते अजय बोरस्ते, सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख बंटी तिदमे आदी उपस्थित होते. या सभेच्या व्यासपीठावर बसायला जागाही शिल्लक राहिली नव्हती. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर ही सभा झाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत जोरदार बॅटिंग करीत या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेपासून तर थेट जनतेशी असलेला आपला कनेक्ट यांना दिले. यामुळे मतदारांनी भरभरून मतदान केले. शिवसेना शिंदे पक्षाला १५ लाख ज्यादा मते मिळाली, असा दावा त्यांनी केला. एकंदरच या सभेला शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत मोठी गर्दी जमवली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आभार दौरा यशस्वी झाला. मात्र त्यात देण्यात आलेले चुकीचे राजकीय संदर्भ चर्चेचा विषय ठरले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com