Eknath Shinde Politics: फडणवीसांंच्या बैठकीकडे पाठ फिरवलेल्या शिंदेंचं नाशिकमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन

Eknath Shinde Nashik Visit : उपमुख्यमंत्री शिंदे आभार दौऱ्यानिमित्त नाशिकला येणार असल्याने शिवसेना शिंदे पक्षात सगळीच यंत्रणा कामाला लागले होते. विरोधक आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांना आकर्षित करण्यासाठी गेले दोन दिवस रात्रंदिवस काम सुरू होते.
Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार स्थापन झालं असलं तरी सरकारच्या शपथविधीपासून उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलावलेल्या बैठकांनी उपमुख्यमंत्री शिंदेंनी दांडी मारल्याचं बोललं जात आहे.त्यात दोन दिवसांपूर्वीच्या नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा संदर्भातील आयोजनाची बैठक फडणवीसांनी बोलावली होती. या बैठकीला शिंदे गैरहजर राहिले होते. पण आणि आता त्यांंनी नाशिकमध्ये जाऊन स्वतंत्र कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचंही पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आभार दौऱ्यानिमित्त नाशिकला सभा घेतली. तत्पूर्वी त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत पंतप्रधान मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कित्ता गिरवला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा बाबत आढावा बैठकीत मार्गदर्शन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा झाली या सभेला मंत्री गुलाबराव पाटील दादा भुसे यांसह विविध नेते उपस्थित होते. सभेला जवळपास तीन तास उशीर झाला तत्पूर्वी झालेल्या सर्व भाषणांमध्ये नेत्यांनी श्री शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले. राज्यात लाडकी बहीण योजनेने क्रांती घडवली आहे. या योजनेमुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Dhananjay Munde Vs Dhas : कोंबडं कितीही झाकलं तरी...! सुरेश धस अन् बावनकुळेंच्या दाव्यानं मुंडेंचं कार्यालय काही मिनिटांतच तोंडावर पडलं

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून तिची अंमलबजावणी झाली. राज्यातील महिलांना आधार देण्याचे मोठे काम त्यांनी केले. शिंदे यांना सामान्य महिला आणि नागरिकांविषयी आपुलकी आणि जिव्हाळा आहे. त्यातूनच ही योजना राबवली गेली, असे सांगत लाडके बहीण योजनेचे सर्व क्रेडिट उपमुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदे आभार दौऱ्यानिमित्त नाशिकला येणार असल्याने शिवसेना शिंदे पक्षात सगळीच यंत्रणा कामाला लागले होते. विरोधक आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांना आकर्षित करण्यासाठी गेले दोन दिवस रात्रंदिवस काम सुरू होते. या निमित्ताने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन फलक आणि शिंदे यांच्या प्रतिमा झळकविण्यात आल्या होत्या.

Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारला मोठा दिलासा! घेतला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, 10 ते 15 दिवस...

विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगले नियोजन करा. महा कुंभमेळ्यापेक्षाही नाशिकचा कुंभमेळा आदर्श झाला पाहिजे. त्यासाठी महा कुंभमेळ्यातील त्रुटींचा अभ्यास करून त्यावर योग्य उपाय योजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

नाशिकला होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त नाशिक शहरासाठी नव्हे तर सबंध राज्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. यानिमित्ताने या शहरात विविध पायाभूत सुविधा आणि विकास कामे करावीत जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करावा. त्यासाठी बारकाईने नियोजन करावे प्रयागराज येथील महा कुंभमेळ्याच्या धरतीवर दक्षता घेऊन नियोजन करावे. शासकीय यंत्रणेत एकोपा आणि सुसूत्रीकरण असले पाहिजे. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची माहिती देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी घेतली.

Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Suresh Dhas Video : मोठी बातमी! धनंजय मुंडेंसोबत भेट झाली, सुरेश धसांची कबुली; म्हणाले, 'झाकून लपून नाही तर...'

एकंदरच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज आपल्या आभार दौऱ्यानिमित्त केलेला कार्यक्रम आणि सभा यातून शक्ती प्रदर्शन केले शक्ती प्रदर्शन करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे बऱ्यापैकी यशस्वी झाले असे चित्र पाहायला मिळाले यानिमित्ताने शहरभर फलक झेंडे होर्डिंग आणि रोशनाईचा झगमगट पाहायला मिळाला. माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपला कार्यक्रम एक इव्हेंट म्हणून यशस्वी केला असा संदेश त्यांनी नाशिककरांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com