
Bawankule On Kalyan Constituency: कल्याण लोकसभा मतदारसंघ कोणाचा यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटात हमरीतुमरी सुरू आहे. अशातच काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी लढतील, असे विधान केले आहे.
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विधानामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत शिंदे गट काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
बावनकुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सध्या राज्याच्या विविध भागांचा दौरा करीत आहेत. या दौऱ्यात ते सातत्याने ४५ प्लस अशी भूमिका मांडत आहेत. यामध्ये सहकारी पक्षाच्या अस्तित्वाचे काय अशी शंका सतत पुढे येत होती. त्यावर बावनकुळे यांच्या विधानाने उत्तर मिळाले आहे.
ते म्हणाले, पक्षाची संघटनात्मक बांधणी करून लोकसभा निवडणुकीत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. जागावाटपाचा निर्णय पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल.
जागावाटपाबाबत चर्चेतूनच तोडगा काढला जाईल. खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांना दिवसा स्वप्न दिसतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. खासदार शिंदे हे प्रभावी आहेत, ते ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन पुन्हा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.
वक्तव्याचे राजकारण नको
पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे, तिला उत्तर देण्यास त्या सक्षम आहेत. अशा नोटिसा रद्दही होतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच पालकमंत्रिपदासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. पालकमंत्रिपद जाहीर करण्याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, हेदेखील त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.