Girish Mahajan Chaundi : गिरीश महाजनांच्या शिष्टाईने चौंडीतील आंदोलन थांबणार का ?

Chaundi Dhangar Protest : धनगर एस.टी. आरक्षणासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू
Girish Mahajan Discuss with Dhangar Protester
Girish Mahajan Discuss with Dhangar ProtesterSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाच्या वतीने वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे २१ दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. या काळात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी चौंडीत दाखल झाले आहेत. या चर्चेनंतर महाजनांची शिष्टाई कामी येणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जालना येथे मनोज जरांगेंनी आंदोलन केले. यानंतर ओबीसी समाजाने त्यास विरोध करत राज्यभर आंदोलनातून रान पेटवले. तसेच अनेक वर्षांची मागणी प्रलंबित असल्याने धनगर समाजानेही उपोषणाचे शस्त्र उपसून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चौंडीत तीन आठवड्यांपासून धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू आहे. (Maharashtra Political News)

Girish Mahajan Discuss with Dhangar Protester
Vaidyanath Sugar Factory : मुंडेंच्या कारखान्यातून निघायचा सोन्याचा धूर; आता 'वैद्यनाथ'चे धुराडे का कोलमडले?

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांची सरकारच्या वतीने तत्काळ दखल घेतली, मात्र, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहेत. यातूनच दोन्ही समाजांच्या आंदोलनांना काही मंत्री भेटी देताना दिसत आहे. मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) चौंडीतील आंदोलनाला वारंवार भेटी दिल्या आहेत. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपोषणकर्त्यांची भेटही घेतल्या आहेत. मात्र, मार्ग निघत नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे.

आता दिवसेंदिवस येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहेत. धनगर एस.टी. आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे महाजनांनी सांगितले. 'समाजाने उपोषण आंदोलन मागे घेत सरकारला वेळ द्यावा. ठरलेल्या वेळेत सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेईल,' या असा निरोप मंत्री महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीने घेऊन आल्याची माहिती आहे.

महाजन यांची भेट ठरण्यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंतअण्णा डांगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे. यानंतर उपोषण सोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न सरकारच्या वतीने महाजन करताना दिसत आहे. धनगर समाजातील कार्यकर्ते आणि मंत्री महाजन यांच्यातील चर्चेत काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Girish Mahajan Discuss with Dhangar Protester
Sangli NCP Politics : राष्ट्रवादीच्या दुफळीने ओलांडले घरांचे उंबरठे; सांगलीत 'या' पिता-पुत्रांची विरोधात भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com