Eknath Shinde politics: परसेवेतील अधिकाऱ्यांचा वाद पोहोचला एकनाथ शिंदेंच्या दारी!

Eknath Shinde; Local officials will be given priority in Nashik Municipal Corporation-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते म्हणतात परसेवेतील अधिकाऱ्यांना नो एन्ट्री
Eknath Shinde, Bunty Tidme & Raju lawte
Eknath Shinde, Bunty Tidme & Raju lawteSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: नाशिक महापालिकेत परसेवेतील अधिकाऱ्यांना विशेष रस निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे हा प्रश्न आता राजकीय होतो की काय अशी स्थिती आहे.

परत सेवेतील अधिकाऱ्यांना विरोध म्हणून महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती त्यावर नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी सबुरीचा सल्ला दिला होता.

Eknath Shinde, Bunty Tidme & Raju lawte
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांना स्वतःच्याच गावातून मिळाला 'घरचा आहेर'; जोर्वेच्या ठरावामुळे राजकारण पेटलं

आता मात्र या विषयावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने बाह्या सरसावत उडी घेतली आहे. या संदर्भात महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि सहसंपर्कप्रमुख राजू अण्णा लवटे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नाशिक महापालिकेत जाणीवपूर्वक परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती होत असल्याची तक्रार त्यांनी केली.

Eknath Shinde, Bunty Tidme & Raju lawte
Manikrao Kokate Politics: मंत्र्याच्या कन्येने न्यायालयालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले का?, काय आहे प्रकरण?

महत्त्वाच्या पदांवर परत सेवेतील अधिकारी नियुक्त केले जातात. त्यांना शहराबद्दल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समस्यांविषयी फारसी माहिती नसते. त्यामुळे महापालिकेचे कामकाज करताना नव्या समस्या उभ्या राहत आहेत. त्याबाबत शहरात आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याची तक्रार त्यांनी केली.

यासंदर्भात नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर तातडीने अभ्यास केला जाईल. प्रशासनाकडून याबाबतची माहिती मागवून प्रशासकीय कामकाजात स्थानिक आणि परसेवेतील अधिकाऱ्यांचा समन्वय निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सेवा शर्तीच्या पात्रतेच्या निकषानुसार आणि पदोन्नती समितीने शिफारस केलेल्या महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत विचार केला जाईल. यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून परसेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेत आणले जात असल्याने प्रशासनात अन्यायाची भावना आहे. ही भावना दूर करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना नियुक्ती बाबत प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महापालिकेत प्रशासकीय कामकाजावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे यांनी दोन वेळा महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर पालकमंत्री पदासाठी चर्चेत असलेले गिरीश महाजन यांनीही महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आता त्यात परसेवेतील अधिकाऱ्यांबाबत हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com