Eknath Shinde News : लोखंडेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचं स्नेहलता कोल्हेंना साकडं; आता फडणवीसांच्या आदेशाकडं लक्ष

Shirdi Lok Sabha Constituency : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
Snehlata Kolhe, Eknath Shinde
Snehlata Kolhe, Eknath ShindeSarkarnama

Ahmednagar Political News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडेंना तर दक्षिण नगरमधून भाजपचे सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांच्या फटकून वागण्यामुळे विखे आणि लोखंडेंच्या प्रचाराला वेग येत नसल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी भाजप नेत्या, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे कोल्हेंनी सांगितले. त्यामुळे लोखंडेंच्या प्रचारात कोल्हे कधी सक्रिय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

शिर्डीत खासदार लोखंडे Sadashiv Lokhande, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, वंचितकडून उत्कर्षा रुपवते अशी तिरंगी लढत होत आहे. लोखंडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे शिर्डीत होते. त्यावेळी त्यांनी स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली. दरम्यान, कोल्हे या भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर नाराज असल्याची माहिती आहे. यातून त्या सुजय विखे आणि लोखंडे यांचा अर्ज भरतानाही उपस्थित नव्हत्या. त्या कुठल्याही प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हे यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

Snehlata Kolhe, Eknath Shinde
Rahul Gandhi News : राहुल गांधी अमेठीतून लढणार? स्वागताची जोरदार तयारी सुरू

या भेटीत मुख्यमंत्री शिंदेंनी स्नेहलता कोल्हेंची Snehlata Kolhe विखेंवरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. याबाबत कोल्हे म्हणाल्या, आमची राधाकृष्ण विखेंवर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, मात्र पालकमंत्री म्हणून त्यांनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. यात विकास निधी, रस्त्याची कामे आदी काही मुद्द्यांवर चर्चा झाली. आता आमच्यावर झालेल्या पक्षांतर्गत अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार विखे आणि लोखंडेंच्या प्रचारात सक्रिय होणार का, असा प्रश्न केला. त्यावर कोल्हे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी चर्चा केल्यानंतरही आता फडणवीस Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा केल्यानंतरच स्नेहलता कोल्हे आणि कार्यकर्ते प्रचारात सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्या काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Snehlata Kolhe, Eknath Shinde
Navneet Rana : मतदानादिवशीच नवनीत राणांना झटका, हनुमान चालिसा पठणप्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com