Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा!

Eknath Shinde; police FIR for ransom against ex corporator's husband Ravi Pagare-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात पगारे यांनी प्रवेश केला आहे.
Police Action
Police ActionSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics: शिक्षकी पेशाशी संबंधित आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या माजी नगरसेविकेच्या पतीवर चक्क खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांनी नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका सुषमा पगारे आणि त्यांचे पती रवी पगारे यांनी नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. मात्र आता त्याहूनही मोठा धक्का राजकीय कार्यकर्त्यांना बसला आहे.

Police Action
Namdev Shastri Politics: भाजप नेत्याचा संताप, "नामदेव शास्त्रींच्या डोक्यात राजकारणाचा किडा"

माजी नगरसेविका पगारे यांचे पती रवी पगारे यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री पगारे आणि सुजय अनिल बुकाने यांच्याकडून खंडणी गोळा केली जात असल्याची तक्रार आहे यासंदर्भात इंडिया सिक्युरिटी प्रेसचे अधिकारी सुरेश आव्हाड यांनी केली आहे.

Police Action
Sujay Vikhe : थोरातांच्या घराशेजारील मैदानावर सुजय विखेंचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स...

नाशिक रोड येथे बाळ येशू चर्च आहे. येथे जत्रा सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून भाविक येथे येतात. या भाविकांच्या बसेस आणि अन्य वाहने इंडिया सिक्युरिटी प्रेस च्या वसाहतीत पार्क करण्यात येत असतात. या वाहनांच्या चालकांकडून महापालिकेचे बनावट पावत्यांद्वारे खंडणी वसूल केली जात असल्याचे आढळले.

या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्री पगारे हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांचे नाव एक चांगला कार्यकर्ता म्हणून घेतले जाते. मात्र त्यांच्याकडून बनावट पावत्यांद्वारे यात्रेकरू कडून वसुली केली जात असल्याचा प्रकार पुढे आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षातून पक्षांतर केलेल्या काही माजी नगरसेवकांवर अशाच प्रकारे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात झाले आहेत. या संदर्भात काही नेत्यांमागे पोलिसांचा ससेमीरा लागला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com