Jalgaon crime News: नोकरी आणि शासकीय कंत्राटे हे फसवणुकीचे प्रमुख माध्यम होऊ लागले आहे. त्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. संदर्भात जळगाव पोलिसांनी एका बंटी आणि बबली ला ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात फसवणूक झालेल्या १७ ते १८ युवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांची संपर्क केल्याचे कळते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यावर त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या नेत्यांचा चटकन विश्वास संपादन करण्याची क्षमता नवी मुंबईच्या या बंटी आणि बबलीला प्राप्त होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात कार्यरत असल्याचा दावा ते करीत असत. त्यातूनच नोकरी आणि विविध इच्छुकांना कंत्राटी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी ५५ लाखांहून अधिक रोकड वसूल केल्याने पोलिसांत तक्रार प्राप्त झाली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असल्याचे सांगितल्याने राजकीय कार्यकर्ते हर्षल यांच्या कार्यालयातच या बंटी आणि बबलीचा सर्व कार्यभार सुरू असायचा. त्यांनी इतरांना गंडा घातला. मात्र ज्याच्या कार्यालयात बसून हे सर्व सुरू होते त्या हर्षललाही १३ लाख रुपयांना फसविल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात पोलिसांनी पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी दोघे राहणार नवी मुंबई यांना ताब्यात घेतले आहे. संघवी दांपत्याने आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात कार्यरत आहोत असे सांगितले. त्यानंतर बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि नियुक्तीपत्र दाखविल्याने अनेकांचा विश्वास बसला.
महसूल तसेच रेल्वेची नोकरी मिळवून देणे, रेल्वेचे कंत्राटे मंजूर करणे, रेल्वेच्या निवेदनबाबत कंत्राटदारांना ऑर्डर मिळवून देणे, म्हाडातून सदनिका मिळवून देणे अशा प्रकारचे अनेक आश्वासने त्यांनी युवकांना दिली. १७ ते १८ युवकांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. यांच्याकडून ५५ ते ६० लाख रुपयांची वसुली झाल्याचे उघड झाले आहे.
जळगाव शहरात हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संघवी दांपत्याने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या नावाने चक्क तोतया सहाय्यक असल्याचे सांगत अनेक दिवस ही फसवणूक सुरू असल्याचे उघड झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.