Eknath Shinde politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिडकोसाठी मास्टर स्ट्रोक, मामा ठाकरेंनी घेतले श्रेय.

Eknath Shinde politics; Mama Thakre took advantage and credit for CIDCO freehold issue-नाशिक पश्चिम मतदार संघातील गेली दहा वर्ष रखडलेला प्रश्न सिडको घरांचा फ्री होल्डचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंनी झटक्यात सोडवला.
Mama Thackre & Eknath Shinde
Mama Thackre & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: नाशिक शहरातील पश्चिम मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्पर्धेत अडकला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मास्टर स्ट्रोक मारला. त्यामुळे शिंदे गटाचे नेते खुशीत आहेत.

नाशिक शहरातील सिडको जागरूक राजकीय नेते आणि मतदारांचा भाग आहे. येथील राजकारण अतिशय चुरशीचे असते. सिडकोवासियांसाठी आगामी निवडणुकीत प्रभाव पडेल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याचे श्रेय पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक बळीराम उर्फ मामा ठाकरे यांनी घेतले.

शहरातील सिडकोची स्थापना १९७० मध्ये झाली. त्याबाबत राज्य शासनाने स्वतंत्र कायदा केला. या कायद्यामध्ये २०१५ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. २०१६ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे काही नियम या भागाला लावण्यात आले.

या भागातील नागरिकांना एकाच वेळी नाशिक महानगरपालिका आणि सिडको प्राधिकरण अशा दोन्ही संस्थांना कर द्यावा लागत होता. घराचे मालक असूनही त्यावर हक्क सांगता येत नव्हता. ही समस्या येथील कामगार आणि गरीब नागरिकांसाठी अतिशय गंभीर झाली होती.

Mama Thackre & Eknath Shinde
Narhari Zirwal Politics: नरहरी झिरवाळ म्हणाले, मी इकडे आलो तर, संतोषचे काय होईल? उपस्थित उत्तरले, वाजवा तुतारी!

या भागात गेली दहा वर्षे भाजपच्या सीमा हिरे आमदार आहेत. त्यांनी याबाबत अनेकदा घोषणा केल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंटी तिदमे यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. मात्र हा मूळ प्रश्न माजी नगरसेवक ठाकरे यांनी गेली वीस वर्षे लावून धरला होता.

श्री. ठाकरे यांनी हा विषय घोषणा व गाजावाजा न करता प्रत्यक्ष पाठपुरावा करून सोडविण्यासाठी धडपड केली. सध्या राज्यात शिंदे मुख्यमंत्री आहेत. श्री ठाकरे हे देखील शिंदे गटातच काम करतात.

त्यांनी याबाबत गेले दोन महिने सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे महत्त्व आणि प्रभाव पटवून दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनीही ठाकरे यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत श्री ठाकरे दोन दिवस मुंबईत ठाण मांडून बसले होते.

Mama Thackre & Eknath Shinde
BJP Politics : "...त्यामुळे गिरीश महाजनांचं विधानसभेचं तिकीट कापणार"; महाजनांपेक्षा जास्त मते मिळतील असा उमेदवार फडणवीसांनी केला जाहीर

हा सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातली होती. मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळाली. या बैठकीत अनेक विषय असल्याने त्याचा अध्यादेश मात्र दोन दिवसांनी निघाला, असे ठाकरे यांनी सांगितले.

या संबंध कालावधीत महायुतीचे सर्वच पक्ष आणि नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त होते. श्री ठाकरे यांनी मात्र महायुतीसाठी माइल स्टोन ठरेल असा निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक महायुती आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला किती फायदेशीर ठरतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

गेली वीस वर्ष यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी, महापौर व आमदारांनी घोषणा केल्या होत्या. पत्रव्यवहाराचा ढीग झाला होता. पालकमंत्री आणि नेत्यांनीही आश्वासनांची खैरात केली होती. मात्र प्रश्न सोडविण्यास कारण ठरले ते मुख्यमंत्री शिंदे. त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात मामा ठाकरे यांनी परिश्रम घेतले. त्याचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी फलक लावल्यावर त्यांचे विरोधक जागे झाले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com