Narhari Zirwal Politics: नरहरी झिरवाळ म्हणाले, मी इकडे आलो तर, संतोषचे काय होईल? उपस्थित उत्तरले, वाजवा तुतारी!

Narhari Zirwal Avoided Political comments: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची दिंडोरी मतदार संघाच्या राजकारणात त्यांच्याच सहकाऱ्यांनी केली कोंडी?
Narhari Zirwal at Kadva Sugar Factory
Narhari Zirwal at Kadva Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आज कादवा साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत यावेळी राजकीय भाष्य केले. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मतदारसंघातील कादवा सहकारी साखर कारखान्याचा ब्रॉयलर प्रदीपन कार्यक्रम आज झाला. कारखाना शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मात्र कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ प्रमुख पाहुणे होते.

त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या कार्यक्रमात झिरवाळ काय बोलतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. झिरवाळ यांनी भाषण सुरू केल्यावर काही उपस्थितांत चुळबूळ झाली. यावेळी तुतारी विषयी झिरवळ काय बोलणार, अशी उत्सुकता होती.

उपस्थितांची अस्वस्थता ओळखून श्री. झिरवाळ यांनी सुचक वक्तव्य केले. ते म्हणाले, हा कार्यक्रम राजकीय नाही. मला खुप वाटते, माझा विचार व्हावा. मात्र मग संतोषचा (शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छूक उमेदवार) विचार कोणी करावा. त्यामुळे खासदार भाषणाची सुरवात कृष्ण हरी अशीच करतात. मी अभंगाने करतो. त्यावर उपस्थितांनी `वाजवा तुतारी` असे प्रत्युत्तर दिले.

Narhari Zirwal at Kadva Sugar Factory
BJP Politics : "...त्यामुळे गिरीश महाजनांचं विधानसभेचं तिकीट कापणार"; महाजनांपेक्षा जास्त मते मिळतील असा उमेदवार फडणवीसांनी केला जाहीर

नरहरी झिरवाळ यांनी यावेळी राजकीय भाष्य टाळले. विकास कामे केली. ती मतदारसंघासाठी केली. कादवा कारखान्याची कधीही अडचण होऊ देणार नाही. मी व्यक्तिगत नव्हे तर मतदारसंघाच्या विकासासाठी काम करतो. यात कुठेही राजकारण नाही, असे विधान केले. त्यामुळे काहींची निराशा झाली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणार का? अशी चर्चा त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही करीत असतात. त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. श्री. झिरवाळ यांनी देखील मौन बाळगले आहे.

श्री. झिरवाळ यांच्या मतदारसंघातील राजकीय हालचाली त्यांची कोंडी झाली आहे, असे दर्शविणाऱ्या आहेत. श्री झिरवाळ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील, अशी सद्यस्थिती आहे. मात्र त्यांचेच काही सहकारी त्यात अडथळा आहेत.

Narhari Zirwal at Kadva Sugar Factory
Nilesh Lanke Vs Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंच्या सुडाच्या राजकारणावर खासदार लंकेंचा निशाणा; म्हणाले, 'सुंभ जळाला...'

महायुतीच्याच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनीही तेवढीच जोरकस निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यादेखील एक इच्छुक उमेदवार आहेत.

एकीकडे मुलगा गोकुळ झिरवाळ उमेदवारी करणार का? या प्रश्नाने त्रस्त आहेत. दुसरीकडे महायुतीतील काही नेत्यांनीच त्यांची कोंडी करण्याची व्यवस्था केली आहे. श्री झिरवाळ यांनी शरदचंद्र पवार पक्षाकडे येऊन तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला, तरीही त्यांच्या अडचणी कमी होतील असे दिसत नाही.

त्यांचेच सहकारी धनराज महाले आणि श्रीमती चारोस्कर या महायुतीचे उमेदवार होतील. अशा स्थितीत सध्यातरी यांची राजकीय कोंडी झाली असे चित्र निर्माण झाले आहे.

कादवा कारखान्याच्या कार्यक्रमात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भास्कर भगरे आणि श्रीराम शेटे यांसह विविध नेते उपस्थित होते. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांपासून दुरावलेले नाहीत, असाच संदेश वारंवार दिला जातो.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे, प्राध्यापक अशोक बागुल, वणीचे माजी सरपंच मधुकर भरसट आणि श्री झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत आचारसंहिता जाहीर झाल्याशिवाय ही राजकीय कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. त्यात श्री झिरवाळ यांची अडचण महायुतीतील नेत्यांनीच केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com