Shivsena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेसाठी ठाणे पालघर मतदारसंघातून रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड करण्यात यशस्वी झाले. यानिमित्ताने आत्मविश्वास वाढलेल्या शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच आगपाखड केली. राज्यातील सर्व 17 जागा महायुती जिंकणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
मात्र ठाणे आणि अन्यत्र केलेला प्रयोग जळगाव आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघात यशस्वी होताना दिसत नाही. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला शुक्रवारी दुसऱ्यांदा दौरा केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी यांनी मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार माघार घेतली. मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे मैदानात खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी आता विरोधकांच्या प्रमुख मोहऱ्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गोकुळ गीते यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या काही नगरसेवकांकडूनच फूस मिळत आहे. आमदार नरेंद्र दराडे यांचा मतदारांची गेल्या आठ वर्ष कोणताही संपर्क नव्हता. विशेषतः आमदार निधीचा करताना त्याचा वापर त्यांनी प्रामुख्याने व्यक्तिगत स्तरावरच केल्याचा आरोप होतो. निधीसाठी अनेक नगरसेवकांना नाराज केल्याने उमेदवार दराडे चांगलेच बॅकफूटवर आले आहेत.
उमेदवार दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात येत आहे. आता हा राजकीय लढा व्यक्तिगत स्तरावर गेला आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांनी मंत्री उदय सामंत यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मतदारसंघात उमेदवार देताना चूक केली. अन्य उमेदवार असता तर चित्र वेगळे दिसले असते. या संदर्भात आता बंडखोर शिंदे पक्षाच्या नगरसेवकांमध्ये संदेश देण्यात व्यस्त झाले आहेत. त्यांच्या या प्रयोगामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि अन्यत्र केलेल्या प्रयोग नाशिक मध्ये यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांची उमेदवार गोकुळ गीते यांना मधाचे बोट लावण्याचा तो प्रयोग यशस्वी झाल्याने ते चांगलेच हतबल झाल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.