Bhaskar Jadhav : मतदान होताच भास्कर जाधवांनी सरकारलं घेरलं? विरोधी पक्षनेतेपद, अधिवेशनासह विविध मुद्द्यांना हातच घातला

Nagpur Winter Session : नुकताच कोकणासह राज्यातल्या नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मतदान झाले असून आता निकाल पुढे ढकलण्यात आला आहेत.
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांवरून एका आठवड्यापर्यंत कमी केल्याने विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

  2. भास्कर जाधव यांनी सरकारवर अधिवेशन "गुंडाळण्याचा" आरोप करत हल्लाबोल केला आहे.

  3. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली असून, राजकीय तापमान वाढले आहे.

Assembly Session News : राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले आहे. आता निकालही पुढे ढकलण्यात आला असून सत्ताधाऱ्यांसह विरोधाकांना हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले आहेत. नागपुरमध्ये अधिवेशनाची तयारी झाली असून ते 8 ते 14 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यावरून आता वाद सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी एक आठवड्यात गुंडाळल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावरूनही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी एक आठवड्यात गुंडाळण्यात आले असून ते 14 तारखेला संपवण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून भास्कर जाधव यांनी, सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असले तरी त्यांच्यात नैतिक धाडस नसल्याची टीका केली आहे.

तसेच, विधान परिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत, विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक असून उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर लोकशाहीची परंपरा राखण्यासाठी दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेतेपद याच अधिवेशनात सरकारने जाहीर करावे असाही आग्रह विरोधकांनी धरल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना हट्ट महागात पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात मातोश्रीवरूनच सूत्र फिरली

त्यांनी, आपण पक्षात नाराज नाही. कोणावर आपला राग नाही असे सांगताना निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असतानाही कुठल्या पक्षाच्या कार्यामध्ये बसून काय निर्णय घेतो हे समजत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयोगाने मतदानाच्या एक दिवस अगोदर मतमोजणी होणार नाही ती 21 तारखेला होईल असे जाहीर करतं. यामुळे लोकशाहीची, निवडणुकांची थट्टा उडवण्याचा काम सत्ताधारी पक्ष आणि स्वतःची स्वायत्तता न राहिलेल्या आयोगाकडून केलं जात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर एकाच वेळी निवडणुक आयोगाच्या भूमिकेवर वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी तोफ डागली आहे. भास्कर जाधव यांनी, एका वेळेला मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात. तर दुसऱ्या बाजुला ते आयोगाच्या निर्णयाची बाजूनेही बोलतात. याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री हे दोन तोंडाने बोलतायत. जे महाराष्ट्राला पाहायला मिळाल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : ठाकरे सेनेत पुन्हा कलह!मातोश्रीवरून कानपिचक्या मिळताच भास्कर जाधव सभेला हजर, पण राऊतांनी मारली दांडी

FAQs :

1. नागपूर अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यामागे कारण काय सांगितले जाते?
सरकारकडून अधिकृत माहिती मर्यादित असून, विरोधकांचा आरोप आहे की चर्चा टाळण्यासाठी कालावधी कमी करण्यात आला.

2. भास्कर जाधव यांनी कोणते आरोप केले?
त्यांनी सरकारवर अधिवेशन गुंडाळण्याचा आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला.

3. अधिवेशन यंदा किती दिवसांचे आहे?
यंदाचे हिवाळी अधिवेशन फक्त एका आठवड्याचे आहे.

4. विरोधकांचा मुख्य आक्षेप काय आहे?
महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून अधिवेशन कमी केले, असे त्यांचे म्हणणे आहे.

5. या निर्णयाबाबत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे का?
सरकारकडून अद्याप अधिकृत सविस्तर कारणे समोर आलेली नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com