Nashik Politics : नाशिककरांना दिलासा?; भाजपच्या 3 आमदारांना जमलं नाही, ते शिंदे गटानं करून दाखवलं?

Nashik Municipal Corporation Property Tax Politics Shiv Sena vs Bjp : नाशिक महापालिकेच्या वाढीव मालमत्ताकरामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. आता ही नाराजी दूर करण्याचा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे...
Eknath Shinde, Dada Bhuse
Eknath Shinde, Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Corporation Property Tax News :

भाजप सत्तेत असताना तुकाराम मुंडे यांनी वाढविलेली घरपट्टी रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पालकमंत्री आणि तीन आमदारांना जमले नाही, ते शिंदे गटाने करून दाखवले, असा संदेश यातून गेला आहे.

भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 2018 मध्ये शहरवासीयांवर मोठी घरपट्टी वाढवली होती. त्यातून जनतेत मोठा आक्रोश निर्माण झाला. अनेक नागरिकांनी आंदोलने केली. त्याबाबत भाजपच्या आमदारांनी अनेक घोषणा केल्या. पालकमंत्री Girish Mahajan यांनीही वाढवलेली घरपट्टी रद्द करू, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात कृती मात्र झालीच नाही. नागरिकांना मोठा भुर्दंड बसला. आता हा प्रश्न सोडवण्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

Eknath Shinde, Dada Bhuse
Loksabha Election 2024 : भाजप म्हणते, "नाशिक मतदारसंघ आमचाच"

यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी गेले काही दिवस पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महासभेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेल्या घरपट्टी वाढीविरोधात एकमताने ठराव करण्यात आला होता. घरपट्टी वाढीचा निर्णय स्थगित करण्याबाबत बोरस्ते यांनी 31 मार्च 2018 रोजी ठराव क्रमांक 522 अन्वये संबंधित घरपट्टी रद्द करावे, असा प्रस्ताव दिला होता.

हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. प्रशासनाने तो विखंडित करण्यासाठी राज्य शासनाला पाठविला होता. संबंधित खाते भाजपकडे होते. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. मात्र त्यांनी गेल्या सहा वर्षांत या संदर्भात काहीही केले नाही. जनतेवर वाढीव घरपट्टीचा बोजा पडला होता. आयुक्त मुंडे यांच्यापुढे सत्तेचेही चालेना, असे चित्र होते. त्याचे नुकसान शहरवासीयांना भोगावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्कालीन आयुक्त मुंडे यांनी निवासी आणि अनिवासी तसेच व्यावसायिक घरपट्टीत मोठी वाढ केली होती. त्याबरोबरच इमारतींच्या पार्किंगला देखील घरपट्टी आकारणी केली होती. सामान्यता निवासी घरपट्टीत 68 टक्के तर अनिवासी घरपट्टीत जवळपास 400 टक्के दरवाढ झाली होती. ही दरवाढ रद्द करण्यासाठी महासभेने ठराव देखील केला होता. नागरिकांनीही विरोध केला. मात्र त्या कशालाही न जुमानता एक एप्रिल 2018 पासून वाढीव घरपट्टी लागू झाली होती.

आता राज्यातील बदलत्या परिस्थितीत शिंदे गटाचे शहर अध्यक्ष अजय बोरस्ते व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे याबाबतचा आदेश कधी निघतो? याची नाशिककरांना प्रतीक्षा आहे.

आगामी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या पक्ष विस्तारासाठी उत्तम प्रकारे केला आहे. पालकमंत्री दादा भुसे महापालिकेच्या दैनंदिन कामातही लक्ष घालून पक्षाच्या विस्तारात व पदाधिकाऱ्यांच्या कामांमध्ये भूमिका घेतात. त्यामुळे भाजप महापालिकेत दीर्घकाळ सत्तेत असूनही राजकीय दृष्ट्या मागे पडला आहे.

Eknath Shinde, Dada Bhuse
Maratha Reservation News : भाजपचे बाहुले बनलेले 'ते' चार नेते कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com