Eknath Shinde Politics: अहो आश्चर्यम! ज्याच्याकडे दोन कोटींची माया सापडली, तो सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणे झोपडपट्टीत राहतो?

Shivsena Shinde group leader jayant sathe found living in slum: विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आले होते.
Alka Ahirrao with accuse with Money in Hotel
Alka Ahirrao with accuse with Money in HotelSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde News: देवळाली विधानसभा मतदार संघाची निवडणूक आणि वाद हे एक समीकरण बनू पाहत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा नेता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. १.९८ कोटी रुपयांसह सापडलेल्या नेत्यांच्या बाबतीत धक्कादायक खुलासा पुढे आला आहे.

विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा दुरुपयोग झाल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संपर्कप्रमुख जयंत साठे यांना नाशिकच्या तारांकित हॉटेलमध्ये १.९८ कोटी रुपयांसह ताब्यात घेण्यात आले होते. प्राप्तीकर विभागाकडून त्याची चौकशी सुरू होती.

Alka Ahirrao with accuse with Money in Hotel
Devayani Farande Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा संताप; माझ्याविषयी ड्रग्सचे खोटे नॅरेटिव्ह पसरवले!

पोलिस आणि प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत संबंधित श्री. साठे यांनी ते पैसे आपले आहेत. आपल्या व्यवसायातून मिळालेले पैसे असल्याचा दावा, त्यांनी केला होता. मात्र या प्रकरणाची पुढे चौकशीत झाली नाही. त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याची धक्कादायक बाब चर्चेत आहे.

Alka Ahirrao with accuse with Money in Hotel
Chhagan Bhujbal Politics: अखेर छगन भुजबळ यांनी मान्य केला जरांगे पाटील इफेक्ट, म्हणाले...

आता यामध्ये मोठा खुलासा झाला आहे. याबाबत थेट प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते मसुद जिलानी यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सूत्रे हलली आणि संबंधित रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला होता. त्यात शिवसेना शिंदे पक्षाचे संपर्कप्रमुख जयंत साठे हा कोट्यावधी रुपयांसह सापडला.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या भगिनी अलका अहिरराव यादेखील रूममध्ये उपस्थित होत्या. याबाबत जनता दलाचे नेते गिरीश मोहिते यांनी थेट आयकर आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. मात्र राजकीय हस्तक्षेप असल्याने संबंधितांना वाचविण्यासाठी काही सत्ताधारी नेते प्रयत्न करीत आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

हे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले. शिवसेना शिंदे गटाचा संपर्क नेता असलेला जयंत साठे हा ठाणे येथील आनंदनगर येथील कोपरी नगर झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडील हे दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डधारक आहेत. ते नियमितपणे शासनाचे मोफत धान्य घेतात. अशा व्यक्तीकडे १.९८ कोटी एवढी मोठी रक्कम कशी येऊ शकते? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, असे जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते मोहिते म्हणाले.

या पैशांचा मूळ स्त्रोत शोधण्याची आवश्यकता आहे. हा स्त्रोत सापडल्यास त्यात मोठे राजकीय कनेक्शन उघडकीस येईल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी श्री मोहिते यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com